Take a fresh look at your lifestyle.

दिपक चहरची ही बहिण आहे माॅडेल, फोटो पाहून पडाल प्रेमात

मुंबई | 27 वर्षीय दिपक चहर टी -20 क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेणारा पहिला भारतीय पुरुष क्रिकेटपटू बनला आहे. चहर याचे संपूर्ण देशात कौतुक केले जात आहे. अशात चहर याची बहिण मालती चहर हिने देखील इंन्स्टाग्रामवर वर व्हिडिओ पोस्ट करत आपल्या भावाचे कौतुक केले आहे.

मॉडेल आणि अभिनेत्री मालती चाहरला तिचा भाऊ दीपकच्या अभिनयाचा अभिमान वाटतो. सोशल मीडियावर मालतीने आपला आनंद व्यक्त करताना आपला व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करत, ‘हॅटट्रिक आणि टी -20 आंतरराष्ट्रीय मधील 3.2-0-7-6 मधील सर्वोत्कृष्ट आकडा. मला तुझा अभिमान आहे’ असं म्हटलं आहे.

मालती चाहर एक मॉडेल आणि अभिनेत्री आहेत. स्वत: ला फिट ठेवण्यासाठी ती जिममध्ये बराच वेळ घालवते. ती मिस दिल्ली स्पर्धेची द्वितीय धावपटूही राहिली आहे. मालती पहिल्यांदा इंडियन टी -20 लीगमध्ये दिसली. त्यावेळी तिला मिस्ट्री गर्ल म्हटले जात होते. अनेकजणांनी सांगितले होते की ती साक्षी धोनीची मैत्रीण आहे आणि म्हणूनच ती आयपीएल पाहण्यासाठी येते. मात्र, नंतर ती दीपक चाहरची बहीण असल्याची माहिती पुढे आली.

मालतीला इंन्स्टाग्रामवर मोठा चाहता वर्ग आहे. मालतीला एकुण ४ लाख फॅन फाॅलोअर आहे. मालती माॅडेलिंग क्षेत्रात असल्याने आणि भाऊ क्रिकेट मध्ये लोकप्रिय असल्याने मालतीसुद्धा सध्या ट्रेंडींगमध्ये आहे.

View this post on Instagram

And the waiting _______?

A post shared by Malti Chahar(Meenu) (@maltichahar) on

Comments are closed.

%d bloggers like this: