Take a fresh look at your lifestyle.

मन उडू उडू झालं’ मालिका फेम अभिनेता अजिंक्य राऊतच्या कारला भीषण अपघात; पहा व्हिडीओ

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या झी मराठीवर मन उडू उडू हि मालिका हळूहळू प्रेक्षकांचे मन जिंकताना दिसत आहे. या मालिकेत अभिनेता अजिंक्य राऊत आणि याच्यासोबत अभिनेत्री हृता दुर्गुळे मुख्य भूमिकेत झळकताना दिसत आहेत. उत्तम अभिनय आणि हटके स्टाइलच्या जीवावर अजिंक्यने तरुणाईच्या मनावर भूल पडली आहे. यामुळे तो सतत या ना त्या कारणामुळे चर्चेत असतो. पण यावेळी त्याने चर्चेत असण्याचे कारण म्हणजे त्याच्या कार्ल झालेला भीषण अपघात. होय. मन उडू उडू झालं मालिकेतील अभिनेता अजिंक्य राऊत अपघातामधून थोडक्यात बचावला आहे.

 

दिवाळीनिमित्त अजिंक्य त्याच्या मित्रांसमवेत मुळगावी परभणीला जात होता. या प्रवासादरम्यान त्याच्या कारला भीषण अपघात झाला. सुदैवाने या अपघातामधून सगळे सुखरूप बाहेर पडले. याबद्दलचा एक व्हिडीओ अंजिक्यने स्वतःच सोशल मीडियावर शेअर केला आहे. दिवाळीनिमित्त गिफ्ट घेऊन मित्रांसोबत गावी जात असताना गाडी स्किट होऊन ती खांबावर आदळणार हे पाहून मित्राने गाडी बाजूला घेतली तर ती थेट खाली झुडपात जाऊन अडकली. या झुडपामुळे आम्ही वाचलो. गाडी थोडीफार पुढून आणि मागून दोन्ही बाजूने बरीचशी चेपलेली या व्हिडिओमध्ये दिसत आहे. यानंतर ट्रॅक्टरला दोरी बांधून गाडी झुडपातून बाहेर काढावी लागली.

अजिंक्यच्या अपघाताची बातमी सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरताना दिसतेय. इतकेच नव्हे तर त्याचे चाहते त्याच्याप्रती प्रेम आणि काळजी व्यक्त करताना दिसत आहेत. अजिंक्य साकारत असलेली इंद्रा हि भूमिका तरुणांमध्ये वेगळंच क्रेझ तयार करतेय. इतकाच काय तर तरुणी तर अक्षरशः अजिंक्यचा स्टाईल आणि स्माईलवर फिदा झाल्या आहेत. मन उडू उडू झालं हि मालिका सध्या तुफान गाजत आहे. यामुळे अगदी काही दिवसातच मालिकेने चांगला प्रेक्षक वर्ग निर्माण केला आहे असे म्हणायला काही हरकत नाही.