Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘जग्गू आणि जुलिएट’च्या ‘मना..’ गाण्याने जिंकली प्रेक्षकांची मनं; एका दिवसात मिळाले ‘इतके’ व्ह्यूज

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 19, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Jaggu ani Juliet
0
SHARES
28
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। पुनित बालन स्टुडिओज् निर्मित ‘जग्गू आणि जुलिएट’ या चित्रपटात अमेय वाघ ‘जग्गू’ तर वैदेही परशुरामी ‘जुलिएट’ची मुख्य भूमिका साकारत आहेत, हे आपल्याला मोशन पोस्टरमधून समजलंच होतं. पण त्यानंतर आलेल्या टीझरलाही प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला आणि आता या चित्रपटातील पहिले रोमँटिक आणि मोहक गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आल्यानंतर हे गणेदेखील ट्रेंड करत आहे. अजय- अतुल यांचं संगीत लाभलेल्या या चित्रपटातील गाण्यांची प्रतीक्षा प्रेक्षकांना होती. अशातच ‘मना’ हे कलरफुल गाणं रिलीज झालं आणि प्रेक्षकांच्या मनाला भावलं.

‘मना’ या गाण्यात कोळीवाड्यातला जग्गू, अमेरिकेच्या जुलिएटसमोर आपलं प्रेम व्यक्त करताना दिसतोय… दिलखुलास गाणं म्हणताना दिसतोय आणि जुलिएटच्या उत्तराकडे डोळे लावून बसलेला दिसतोय. तर जुलिएटच्या मनाची अवस्था काहीशी भांबावल्यासारखी झालेली दिसते. मात्र, दोघांच्या डोळ्यात एकमेकांसाठी भरभरून प्रेम दिसतंय.

View this post on Instagram

A post shared by Punit Balan Studios (@punitbalanstudios)

‘मना’ या गाण्याला अजय- अतुलचे शब्द आणि संगीत लाभले असून हे गाणे अजय यांनी गायले आहे. या गाण्याने फक्त एका दिवसात तब्बल ५ लाख व्ह्युजचा टप्पा पार केला आहे. इतकेच नव्हे तर हे गाणे सोशल मीडियावरील ट्रेंडिंग गाण्यांपैकी एक ठरताना दिसत आहे. शेवटी पुन्हा एकदा अजय- अतुलच्या संगीताची जादू चालली म्हणायचं.

View this post on Instagram

A post shared by Punit Balan Studios (@punitbalanstudios)

‘पुनीत बालन स्टुडिओज्’ने यापूर्वी निर्मिती केलेला सामाजिक विषयावरील ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाच्या सुपरहिट यशानंतर आता ‘जग्गू आणि जुलिएट’च्या रूपात एक नवीकोरी रोमँटिक लव्हस्टोरी लवकरच प्रदर्शित होत आहे. पुनीत बालन स्टुडिओज् निर्मित, अजय- अतुल यांचे श्रवणीय संगीत आणि महेश लिमये यांच्या दिग्दर्शनाची आणि कॅमेऱ्याची जादू दाखवणारा ‘जग्गू आणि जुलिएट’ हा चित्रपट १० फेब्रुवारी रोजी आपल्या भेटीस येत आहे. झोंबिवलीनंतर या चित्रपटातून अभिनेता अमेय वाघ आणि अभिनेत्री वैदेही परशुरामी यांची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे.

Tags: Amey waghFirst Song ReleasedJaggu ani JulietTrending SongUpcoming Marathi MovieVaidehi ParshuramiYoutube Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group