Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

मानसी नाईकचा ‘एकदम कडक’ अंदाज; मॅडमचं गाणं ऐकलं का नाय..?

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 8, 2022
in Trending, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
964
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोशल मिडीयावर नेहमीच आपल्या अदाकारीसाठी लोकप्रिय ठरलेली आणि आपल्या घायाळ करणाऱ्या सौंदर्याने प्रेक्षकांच्या दिलावर राज्य करणारी अभिनेत्री मानसी नाईक एका कमाल गाण्यातून आपल्या भेटीस आली आहे. सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असणाऱ्या मानसीचं हे नवं गाणं ‘एकदम कडक’ या आगामी मराठी चित्रपटातील आहे. अलीकडेच या चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा पार पडला. यावेळी मानसी देखील उपस्थित होती. या गाण्यावर मानसी नाईक थिरकताना दिसली. गावरान ढंगाचं आणि वेगळ्या अंगाचं हे गाणं प्रेक्षकांना भारी भावलं आहे.

‘एकदम कडक’ या चित्रपटाची आधीच सोशल मीडियावर चर्चा आहे. त्यात आता चित्रपटात पाहुनी कलाकार म्हणून ‘मॅडम कडक हाय’ या गाण्यासाठी मानसी नाईक दिसणार आहे. त्यामुळे हा चित्रपट आणि हे गाणं दोन्ही भारी चर्चेत आलं आहे. नुकताच ‘एकदम कडक’ चित्रपटाचा अनावरण सोहळा धूम धडाक्यात पार पडला आणि यावेळी चित्रपटातील कलाकारांसोबत मानसी नाईकने ‘मॅडम कडक हाय’ या गाण्यावर एकदम कडक परफॉर्मन्स करीत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. सध्या मानसीचं हे गाणं सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Manasi Naik (@manasinaik0302)

मुख्य म्हणजे, ‘एकदम कडक’ या चित्रपटातील ‘मॅडम कडक हाय’ हे गाणे ‘ओ शेठ’ फेम सुप्रसिद्ध गायक उमेश गवळी यांनी गेले आहे. तर चित्रपटातील इतर गाणी सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते, सौरभ साळुंखे, सायली पंकज यांनी गायली आहेत. तसेच संगीत स्व. नरेंद्र भिडे, पंकज पडघन, उमेश गवळी यांनी दिले आहे. ओम साई सिने फिल्म प्रस्तुत आणि गणेश शिंदे दिग्दर्शित- निर्मित ‘एकदम कडक’ हा चित्रपट येत्या २ डिसेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होत आहे. यामध्ये माधव अभ्यंकर, शशांक शेंडे, पार्थ भालेराव, तानाजी गलगुंडे, अरबाज, चिन्मय संत यांच्यासह रुक्मिणी सुतार, भाग्यश्री मोटे, गायत्री जाधव हे कलाकार दिसणार आहेत.

Tags: Ekdam KadakInstagram PostManasi NaikNew Song ReleaseViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group