Take a fresh look at your lifestyle.

अभिनेत्री मंदिरा बेदीच्या पतीचे निधन; हार्ट अटॅक ठरले अखेरच्या श्वासाचे कारण

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड जगतातून नुकतीच एक दु:खद बातमी समोर आली आहे. फिटनेस फ्रीक आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतील विख्यात आणि लोकप्रिय अभिनेत्री मंदिरा बेदीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आज दिनांक ३० जून २०२१ रोजी तिने तिच्या पतीला गमावले आहे. संसाराच्या वाटेत अर्ध्यावरच मंदिराचा पती आणि दिग्दर्शक राज कौशल याने जगाचा निरोप घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज कौशल यांचे निधन हृदयविकाराच्या धक्क्याने अर्थात हार्ट अटॅकने झाले आहे. दरम्यान ते ४९ वर्षाचे होते. मुख्य म्हणजे हार्ट अटॅक आल्यानंतर त्यांना त्वरित रूग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली.

राज कौशल यांनी एकेकाळी बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अभिनेता म्हणून आपल्या फिल्मी करिअरला सुरूवात केली होती. दरम्यान त्यांनी प्यार में कभी कभी, अँथनी कौन है, शादी का लड्डू अश्या काही चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहे. यामुळे राज कौशल यांच्या निधनानंतर आता बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. अभिनेत्री मंदिरा बेदी व दिग्दर्शक राज कौशल यांची पहिली भेट मुकूल आनंद यांच्या घरी झाली. एका ऑडिशनच्या निमित्ताने मंदिर तिथे गेली त्यावेळी राज मुकूल यांकडे अस्टिस्टंट म्हणून काम करत होते. इथूनच दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले आणि त्यांनी १४ फेब्रुवारी १९९९ साली लग्न केले. त्यांना ८ वर्षांचा मुलगा आहे. याशिवाय नुकतीच मंदिरा व राज यांनी एका ४ वर्षाच्या मुलीला दत्तक घेतले होते आणि ते दोघे मिळून आपल्या मुलांचे संगोपन करीत होते.

 

राज कौशल यांचे निधन इतके धक्कादायक होते कि बॉलिवूड जगतातील अनेकांसाठी हि बातमी मोठा शॉक होती. दरम्यान अभिनेता रोहित रॉय याने राज यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. एका माध्यमाशी बोलताना रोहितने म्हटले कि, ‘पहाटे ४.३० वाजता राज आपल्यातून निघून गेला. त्याला हृदयविकाराचा झटका आला यावेळी तो घरीच होता. कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर रुग्णालयात नेण्याआधीच त्याने अखेरचा श्वास घेतला होता. शिवाय सोशल मीडियावरही त्याने एक भावुक पोस्ट शेअर करत लिहिले कि, ‘आतापर्यंत भेटलेली सुंदर व्यक्ती.. तुम्ही लकी असाल तरच तुम्ही त्याला मित्र म्हणू शकाल. गुड बाय न म्हणतात तो निघून गेलाय. व्यक्त व्हायला माझ्याकडे शब्द नाहीत… माझ्या मित्रा, माझ्या भावा, खूप वाईट झालं… पुढच्या आठवड्यात भेटू असं म्हणत गेलो आणि आता तो पुढचा आठवडा कधीच येणार नाही.