Take a fresh look at your lifestyle.

‘मंजिरी नथ’ फुल्ल फॉर्ममध्ये; स्त्री शृंगाराच्या अभिजात दागिन्याला मिळाले अभिनेत्रीचे नाव

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी इंडस्ट्रीतील नामांकित दिग्दर्शक, अभिनेता, गायक, सुत्रसंचालक अशा वेगवेगळया व्यक्तिरेखांमधून लोकांच्या मनावर राज्यकारणाऱ्या प्रसाद ओकबद्दल बोलावे तितके कमीच. पण आज त्याच्याबद्दल नव्हे तर त्याच्या पत्नीबद्दल लिहिण्याचा दिवस आहे. कारणही तसेच आहे. प्रसाद ओकची पत्नी मंजिरी ओकच्या नावे आता बाजारात नथ मिळणार आहे. हि बाब अत्यंत कौतुकास्पद आहे. सध्या सोशल मीडियावर तिच्या कौतुकाचे पूल बांधताना तिचे चाहते आणि मित्र मैत्रिणी अजिबात दमत नाही हेच काय ते विशेष. पण या सन्मानासाठी मंजिरीने सर्वांचे आभार मनात एक पोस्ट लिहिली आहे.

अभिनेता प्रसाद ओकची बायको मंजिरी ओक ही स्वतः एक व्यावसायिक आहे. ती सोशल मिडीयावर विविध ब्रँडसोबत कोलॅबोरेशन करून छोट्या उद्योजकांना मदत करत असते. याचमुळे तिला एक मोठा गौरव प्राप्त झाला आहे. महाराष्ट्राच्या लेकीचं रुपडं आणखी लक्षवेधी वनवणाऱ्या महाराष्ट्रीयन नथीला मंजिरी ओकचे नाव मिळाले आहे. ही नथ आता ‘मंजिरी नथ’ म्हणून ओळखली जाणार आहे. याबाबत तिने स्वतः सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून माहिती दिली आहे. मुख्य म्हणजे मंजिरीने मकर संक्रांतीच्या निमित्ताने केलेल्या खास फोटोशूटमध्ये तिने हि नथ परिधान केली आहे. शिवाय तिने परिधान केले काळ्या रंगाचे वस्त्र, सुवर्ण टेम्पल ज्वेलरी आणि युनिक हेअर स्टाईलसोबत तीचे सौंदर्य आणखीच खुलून आले आहे. सध्या सोशल मीडियावर तिच्या या फोटोंची चर्चा रंगली आहे.

मंजिरी ओकने आपल्या सोशल मीडिया इंस्टाग्रामवर पोस्ट लिहित सर्वांचे आभार मानले आहेत. तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, छोट्या छोट्या उद्योजकांना माझ्याकडून छोटीशी मदत व्हावी या उद्देशानी मी “कोलॅबोरेशन” सुरु केलं. या निरपेक्ष हेतूंचं फळ म्हणूनच कि काय…आज एका “नथी” ला माझं नाव दिलं गेलंय “मंजिरी नथ”.लोकांच्या चेहऱ्यावर आनंद यावा म्हणून मी प्रयत्न केले…करत राहीनच… पण आज माझ्या चेहऱ्यावर आनंद आणि अभिमान सुद्धा आहे… आणि तो तंतुह यांच्यामुळे आलाय. तेव्हा स्वाती घोडके यांचे मनःपूर्वक आभार.