चंद्रासोबत थिरकली मंजिरी; व्हिडीओ पोस्ट करीत केले अभिनेत्रीचे कौतुक
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘चंद्रमुखी’ या विश्वास पाटील यांच्या कादंबरीवर आधारलेला बहुचर्चित चित्रपट ‘चंद्रमुखी’ गेल्या बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. कधी याचा ट्रेलर हिट होतो तर कधी यातील कलाकारांचे इंट्रोडक्शन रील, तर कधी चंद्रमुखीचे पाहत रहावे असे पोस्टर.. चित्रपटाच्या घोषणेपासून हा चित्रपट कायम लक्षात राहिला आहे. तसेच या चित्रपटात आपल्या मोहक सौंदर्याने आणि अदांनी सर्वांना घायाळ करणारी चंद्रा म्हणजेच अभिनेत्री अमृता खानविलकरदेखील खूप चर्चेत आहे. राजबिंडा दौलत देशमाने म्हणजेच आदिनाथ कोठारेपण चर्चेत काही कमी नाही. अशातच आता अमृताचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये चित्रपटाचे दिग्दर्शक प्रसाद ओक याची पत्नी मंजिरी ओक चंद्रासोबत थिरकताना दिसतेय. शिवाय हा व्हिडीओ पोस्ट करत तिने अमृताचे कौतुकही केले आहे.
View this post on Instagram
दिग्दर्शक प्रसाद ओकची पत्नी मंजिरी ओक हिने अमृतासोबतचा हा डान्स व्हिडिओ शेअर करताना लिहिले आहे की, अमृता तुझा डान्स बघुन ज्यांना डान्स येत नाही अश्यांना पण डान्स करावासा वाटतो. ही तुझ्या डान्सची जादू आहे. (मी त्यातलिच एक) आशीष आणि तू जादूगार आहेस .. तू कुणालाही नाचवू शकतोस. (मी त्यातलीच एक). मंजिरीच्या या पोस्टवर अनेकांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात तिचा पती आणि चित्रपटाचा दिग्दर्शक प्रसाद ओक यानेही कमेंट केली आहे. प्रसाद ओकने कमेंट करत म्हटलं आहे की, तुझं कौतुक करावं तितकं कमी आहे मंजू… एवढ्या धावपळीत तुला हे करावंसं वाटतं याचं मला खरंच अप्रूप वाटतं…खूप खूप खूप प्रेम.
मंजिरी ओकने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. आधी एक पोस्टर शेअर करून आपला रील येणार असल्याचे तिने सांगितले आणि त्यानंतर थेट हा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये अमृता खानविलकर आणि मंजिरी ओक दोघीही चंद्रमुखी चित्रपटातील नुकतेच रिलीज झालेल्या चंद्रा या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. या गाण्याने आणि या रिलने सोशल मीडियावर नुसता धुमाकूळ घातला आहे.