Take a fresh look at your lifestyle.

चावडी बंद? बिग बॉस मराठीच्या स्पर्धकांवर मांजरेकर नाराज; काय आहे प्रकरण? जाणून घ्या

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस मराठी’ हा अत्यंत वादग्रस्त तितकाच लोकप्रिय असणारा शो चांगलाच चर्चेत आहे. दरम्यान दर आठवड्याला रंगणारी ‘बिग बॉस’ची चावडी पाहणं दररोज एपिसोड न पाहणारे लोकसुद्धा आवडीने पाहतात. कारण या चावडीवर संपूर्ण आठवड्यात घडलेल्या घडामोडींचा शो चे होस्ट महेश मांजरेकर आढावा घेतात आणि स्पर्धकांना चांगलेच फाटकारतात. अनेकदा वेळप्रसंगी स्पर्धकांची कान उघडणी करतानाही मांजरेकर दिसतात. आता या आठवड्याच्या चावडीत मांजरेकरांनी भल्याभल्यांच्या दांड्या गुल्ल केल्या आहेत. दरम्यान तृप्ती देसाईं, संतोष चौधरी आणि सोनालीची तर चांगलीच शाळा घेताना मांजरेकर दिसले.

या आठवड्यातल्या ‘बिग बॉस’च्या चावडीवर महेश मांजरेकरांनी स्पर्धक तृप्ती देसाई यांची कानउघडणी केली आहे. अहो नुसती कान उघडणीच नाही तर ‘तुम्ही खेळाडू म्हणून अपयशी आहात’ आणि तुम्ही संचालक असणं सर्वकाही भीषण होतं असंही त्यांनी म्हटलं आहे. कलर्स मराठीने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर बिग बॉसच्या चावडीचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये महेश मांजरेकर घरातील प्रत्येक सदस्याला तासताना दिसत आहेत. मात्र, यावेळी त्यांनी सोनाली पाटील, संतोष चौधरी अर्थात दादूस आणि तृप्ती देसाई यांना धारेवर धरलं असल्याचं दिसून आलं.

“नुकत्याच रंगलेल्या टास्कमध्ये तुम्ही एक वाईट कॅप्टन ठरलात. इतकंच नाही तर या खेळामध्ये तुम्ही एक अपयशी खेळाडू ठरला आहात. तुम्ही जो निकाल दिला तो योग्य नव्हता”, असं महेश मांजरेकर म्हणाले. त्यावर तृप्ती देसाईंनी स्वत:ची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, मांजरेकरांनी त्यांचं काहीही ऐकून घेतलं नाही.

दरम्यान, यावेळी मांजरेकरांनी सोनाली पाटीललादेखील खडे बोल सुनावले आहेत. बिग बॉसच्या घरात आल्यावर तू वेगळं काय केलंस? तर जेवणावरून झालेल्या वादावरूनही त्यांनी सोनालीला झापलं.

तर दादुसकडेही बोट दाखवत, सगळ्यात फेअर वाटायचात तुम्ही पण सगळ्यात अनफेअर तुम्ही वाटले.  पुढे सर्व स्पर्धकांना संबोधून, लाज आणलीत तुम्ही असे म्हणत मला तुमच्याशी बोलायचं नाही असे थेट व्यक्त झाले. इतकंच काय तर बा चा टीव्ही बंदही करायला सांगितला.

त्यामुळे आता आज चावडी रंगणार का विझणार? असा एक प्रश्न उपस्थित होतोय. तसेच आज ‘बिग बॉसच्या घरात ‘बिग बॉस मराठी सीजन 1 विजेती मेघा धाडे आणि एक्स स्पर्धक रेशम टिपणीस जाणार आहेत. आता या दोघी काय हल्लागुल्ला करतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.