Take a fresh look at your lifestyle.

माझ्या मुंबई पोलिसांबद्दल काही बरळेललं सहन करणार नाही ; मनसेनं कंगणाला सुनावलं

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | दिवंगतअभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणापासून बॉलीवूड अभिनेत्री कंगणा राणावत तिच्या वादग्रस्त वक्तव्या मुळे सतत चर्चेत आहे. याच दरम्यान मुंबईची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने कंगना रणौतविरोधात सर्वच स्तरातून संताप व्यक्त होतोय. त्यातच आता मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनीही कंगनाच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली असून माझ्या मुंबई पोलिसांबद्दल काही बरळेललं मीच काय, कोणताही सच्चा मुंबईकर सहन करणार नाही अस म्हणले आहे.

यासंदर्भात अमेय खोपकर यांनी ट्विट केलं असून त्यात म्हटलं आहे की, “माझ्या मुंबई पोलिसांबद्दल ‘जजमेंटल’ होऊन कुणीही ‘पंगा’ घेऊ नये. मुंबईत आज आमच्या बहिणी मध्यरात्रीसुद्धा कामावरुन घरी बिनधास्तपणे जातात, याला कारण आहेत माझे मुंबई पोलीस. आज मुंबईत मी सुरक्षित आहे ते केवळ माझ्या मुंबई पोलिसांमुळे. कामाचा कितीही ताण असो, पगार अनियमित असो, मनुष्यबळ कमी असो, ऊन असो-पाऊस असो…कशीचीही पर्वा न करता हिंमतीने पाय रोवून उभे राहतात ते माझे मुंबई पोलीस. ज्या कुणाला माझ्या या मुंबई पोलिसांची भीती वाटते त्यांनी खुशाल आपापल्या राज्यात जाऊन असुरक्षित राहावं. याला धमकी समजा किंवा सल्ला. पण माझ्या मुंबई पोलिसांबद्दल काही बरळेललं मीच काय, कोणताही सच्चा मुंबईकर सहन करणार नाही”.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्याला मुंबईत न येण्याची धमकी दिली असून मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे अशी टीका कंगनाने ट्विटरवरुन केली होती. कंगणाच्या या भूमिकेमुळे तिला सर्व स्तरातून रोषाचा सामना करावा लागतोय.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’