Take a fresh look at your lifestyle.

असभ्य कमेंट करणाऱ्या युजरचा मानसी नाईकने घेतला लाईव्ह समाचार; आता कमेंट करताना युजर्स करतील दहादा विचार

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री मानसी नाईक सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. तिच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडी ती चाहत्यांसोबत सोशल मीडियावरून शेअर करीत असते. नुकतेच एका युजरने अतिशय असभ्य भाषेत तिच्या एका फोटोवर कमेंट केली. ही कमेंट पाहून मानसी नाईक चांगलीच संतापली. शेवटी तिने एका लाईव्ह सेशनच्या माध्यमातून कमेंट करणा-या युजरचा तिने अगदी चांगलाच समाचार घेतला आहे.

तूम्ही मला बुधावर पेठेत कधी बघितले? त्याच्या पोटापाण्यासाठी त्या काम करतात. बुधवार पेठेत काम करणा-या महिला मोठ्या धाडसाने मेहनत करतात, त्यांचे घर चालवण्यासाठी त्या छाती ठोकुन प्रामाणिकपणे काम करतात, तुमच्यात हिंमत असेल तर तुम्हीही काम करुन दाखवा असे मानसीने कमेंट करणा-याला तिच्या भाषेत चांगलीच चपराक दिली आहे.लाईव्ह सेशनच्या माध्यमातून मानसीने बुधवार पेठेत काम करणा-या महिलांना देखील आदराने वागवण्याची गरज असल्याचे सांगितले. यापूर्वी मानसीला तिच्या लग्नावरून ट्रोल करण्यात आले होते. तुला मराठी मुलगा लग्न करण्यासाठी भेटला नाही का? असे म्हणत या ट्रॉलिंगला उधाण आले होते.

अनेकदा आपल्या आवडत्या कलाकारांच्या कित्येक गोष्टी चाहत्याना आवडत नाहीत. परिणामी ते कलाकारांना सोशल मीडियाद्वारे वाट्टेल त्या भाषेत कमेंट करून अर्वाच्य बोलून ट्रोल करण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी नैतिकतेचे कोणतेही भान न बाळगता हे युजर्स काही बाही बोलून कलाकारांचा व त्यांच्या कलेचा अपमान करतात. अशा युजर्सचा बेशिस्तपणा आता सोशल मीडियावर सहन केला जाणार नाही म्हणत कलाकार आपला संताप व्यक्त करताना दिसतात.

मध्यंतरी असाच प्रकार शशांक केतकरसोबतही घडला होता. त्यानेही वेळीच त्या कमेंट करणाऱ्या युजरला प्रत्युत्तर दिले होते. अत्यंत घाण भाषेत आम्ही कलाकारसुद्धा प्रत्येक कमेंटला रिअॅक्ट होऊ शकतो, पण फक्त मालिका आवडत नाही, तुम्ही निगेटिव्ह भूमिका करु नका, या गोष्टीला लॉजिक नाही वगैरे कमेंट्स एकीकडे. आम्ही फक्त चेहरे असतो, आमच्यावर किमान १५ जण असतात. शिवाय मला कलाकार म्हणून वेगळं काहीतरी करुन बघायचं होत आणि रसिकांनाही वेगळं काहीतरी बघायचं होतं. त्यासाठीच तर ही मालिका आहे” अशा शब्दात शशांकने त्याला खडसावलं.