Take a fresh look at your lifestyle.

रणवीर सिंगची हवा लागली का?; अभिजित खांडकेकरचा अतरंगी लूक पाहून युजर्सने उडवली खिल्ली

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मालिका आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता अभिजित खांडकेकर सध्या सोशल मीडियावर चांगलाच ऍक्टिव्ह असतो. तो नेहमीच विविध फोटो, विविध लूक, विविध पेहराव आणि आगामी प्रोजेक्टची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना देताना दिसतो. पण गेल्या काही तासांपासून तो सोशल मीडियावर त्याच्या युनिक पेहरावामुळे चर्चेत आहे. चर्चेत कसला ट्रोल होतोय ट्रोल. अनेकांनि तर अभिजीतचा हा लुक पाहून त्याला बॉलिवूड अतरंगी अभिनेता रॅम्बो रणवीरची उपमा दिली आहे. रणवीर कसा त्याच्या चित्रविचित्र फॅशनसाठी ओळखला जातो आणि ट्रोल होतो. तास आता अभिजित ट्रोल होतोय. पण जगाची पर्वा करणारे फॅशन जगतात टिकतील कसे? त्यामुळे कशाचीही तमा न बाळगता हाच अ‍ॅटिट्यूड बाळगत अभिजीत खांडकेकरने आपला नवा लूक शेअर केला आहे.

या फोटोत अभिजीत खांडकेकरने एक रंगीबेरंगी जर्किन घातला आहे. त्याच्याखाली त्याने मुलींच्या पलाजोसारखी मिळतीजुळती युनिक अशी पॅन्ट परिधान केली आहे आणि हा फोटो त्याने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. अनेकांना अभिजीतचा हा लुक भारीच आवडला आहे. पण काही नेटक-यांनी मात्र अभिजीतची खिल्ली उडवत त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाय त्याची तुलना रणवीर सिंगशी केली आहे. अजून एक नमुना, मराठीतला रणवीर सिंग अशा प्रकारच्या कमेंट्स काही युजर्सने दिल्या आहेत.

तर अन्य एका युजरने ‘झगा, मगा सर्वांनी मला बघा,’ अशी मजेशीर पण खिल्ली उडवणारी कमेंट केली आहे. इतकंच काय तर एका युजरने चक्क रणवीरसारखा अतरंंगी होऊ नकोस, नाहीतर पोरी तुझ्याकडे बघण थांबवतील, असेसुद्धा म्हटले आहे. तर आणखी एक युजर विचारतोय कि, रणवीर सिंग अंगात घुसलाय का? अशा शब्दांत अभिजीतची खिल्ली उडवत अनेकांनी मजा घेतली आहे. एकंदर काय तर ट्रोल करणारे करुदेत पण त्यामुळे अभिनेता अभिजीत खांडकेकर मात्र अतरंगी लुकमुळे का असेना पण चांगलाच चर्चेत आला आहे.

काही दिवसांपूर्वी अभिजीतने त्याची पत्नी सुखदासोबत पारंपरिक साडीपासून तयार केलेला पोशाख परिधान करत एक लांबलचक पोस्ट टाकली होती. तसेच स्त्री आणि पुरुषांचे कपडे विभागू नयेत असे मतही त्याने स्पष्टपणे व्यक्त केले होते.