Take a fresh look at your lifestyle.

अमेय म्हणतोय, चुकतंय चुकतंय … सगळं सगळं चुकतंय !!!

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता अमेय वाघ सोशल मीडियावर सातत्याने ऍक्टिव्ह असतो. तो त्याचे फोटो आणि व्हिडिओ त्याच्या ऑफिशीयल सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. त्याने नुकताच त्याचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला असून त्यासोबत एक आगळीवेगळी कॅप्शन लिहिली आहे. चुकतंय चुकतंय … सगळं सगळं चुकतंय !!! या कॅप्शनची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार सुरु आहे.

अमेयने चुकतंय चुकतंय ….. सगळं सगळं चुकतंय !!! अशी कॅप्शन लिहित त्याचा फोटो शेअर केला आहे. सोबतच मी घरीच आहे असे देखील लिहिले आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढल्यामुळे अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर त्याने हे कॅप्शन लिहिले असावे, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे.

अमेयने या पोस्टनंतर काही तासाने त्याचा आणखी एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यासोबत अचानक शूटिंग थांबलं ….. सगळी कामं थांबली ! घरबसल्या चांगलं बघावं आणि वाचावं म्हणतो ! काहितरी चांगलं सुचवा !!! असे कॅप्शन लिहिले आहे. तसेच कास्टिंग काऊचचे चित्रीकरण देखील काही दिवस बंद असल्याचे त्याने एक फोटो पोस्ट करत सांगितले आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय अमेय वाघ अनेक तरुणींचा लाडका आहे. अमेयने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात आपले असे वेगळे स्थान निर्माण केले आहे. मराठी सिनेमा, मालिका, रंगभूमी, वेबसीरिज अशा विविध माध्यमातून त्याने आपल्या अभिनयाची छाप मनामनांवर सोडली आहे. दिल दोस्ती दुनियादारी ही अमेयची मालिका तर प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. तसेच मुरांबा, फास्टर फेणे, धुराळा यांसारख्या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे सार्यांनी विशेष कौतुक केले होते. लवकरच अमेय ‘झोंबिवली’ या चित्रपटात दिसणार आहे. आदित्य सरपोतदार हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहेत. २०२१ सालात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.