Take a fresh look at your lifestyle.

‘या कृतीनं लै जनांच्या सनसनीत कानफाडीत मारलेली हाय; किरण मानेंची पोस्ट पुन्हा चर्चेत

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| डिसेंबरच्या २८ तारखेला एका अश्या व्यक्तीचा वाढदिवस जगभर साजरा झाला जी व्यक्ती अनेकांसाठी प्रेरणा आहे. या व्यक्तीने आयुष्यात फक्त दिलंय आणि खूप दिलंय. हि व्यक्ती म्हणजे TATA समूहाचे सर्वेसर्वा आणि दिग्गज उद्योगपती म्हणून जगात नाव असलेले रतन टाटा. जगभरात भले त्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा झाला मात्र त्यांनी त्यांचा वाढदिवस अतिशय साध्या पद्धतीने साजरा केला आणि याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होतोय. ते पाहून टाटांच्या कृत्याचे कौतुक करताना मराठी अभिनेता किरण माने यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे आणि नेहमीप्रमाणे ही पोस्ट चर्चेत आली आहे.

किरण माने यांनी टाटांच्या वाढदिवसाचा फोटो शेअर करत आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, खरंय..खरंय.. या महान माणसाच्या या कृतीनं खरंच लै जनांच्या सनसनीत कानफाडीत मारलेली हाय या ठिकाणी…! …परवाच माझ्या एका मित्रानं त्याच्या शुटिंग सेटवरच्या प्राॅडक्शन कंट्रोलरचा वाढदिवस साजरा करतानाचा व्हिडीओ शेअर केला होता.. “किरण, आम्ही कस्लं एंजाॅय केलं बघ.” म्हन्ला.. चाळीस-बेचाळीस केक आणून त्यात बचाबचा हात बुडवून एकमेकांच्या तोंडावर थापन्याची अक्षरश: रंगपंचमी चालली होती !

पुढे लिहिले की, सगळ्या परीसरात पडणारा केकचा सडा..मूठमूठभर क्रीम हात घेऊन एकमेकांमागे चाललेली पळापळी.. केकची फेकाफेकी बघून संताप येत होता.. बरं, ज्याचा वाढदिवस साजरा होत होता, त्याचं कर्तृत्व, त्याची लायकी, त्याचं ‘कॅरॅक्टर’, त्याची नैतीकता अशी आहे की त्याची वाढदिवसादिवशी खेटरानं पूजा केली तरी कमी हाय !!! त्याचवेळी एका गल्लीतल्या एका सडकछाप गावगुंडानं तलवारीनं केक कापल्याचा एक फोटो बघूनबी संताप येत होता.. असो