Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘स्पायडरमॅन, हल्क कळण्याआधी आपले सुपरहिरोज मुलांना कळायला हवे’; कुशल बद्रिकेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
May 28, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, सेलेब्रिटी
Kushal Badrike
0
SHARES
85
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘रावरंभा’ हा ऐतिहासिक मराठी चित्रपट आहे. जो अलीकडेच २६ मे २०२३ रोजी प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट इतिहासाच्या पानांमध्ये दुर्लक्षित केला गेलेला ‘प्रेम अध्याय’ आहे. संघर्षाच्या पार्श्वभूमीवर घडलेली हि रोमांचकारी प्रेमकथा सध्या प्रेक्षकांचे प्रेम मिळवत आहे. या चित्रपटात ओम भूतकर, मोनालिसा बागल हे मुख्य भूमिकेत आहेत तर अशोक समर्थ, संतोष जुवेकर, कुशल बद्रिके, अपूर्वा नेमळेकर, किरण माने इत्यादी कलाकारही या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिकेत आहे. शंतनू मोघे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आहे. या चित्रपटातून पहिल्यांदाच कुशल बद्रिके नकारात्मक भूमिकेत दिसतो आहे. या चित्रपटातबद्दल कुशने एक पोस्ट शेअर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Kushal Badrike (@badrikekushal)

कुशल बद्रिके हा ‘रावरंभा’ चित्रपटात क्रूरकर्मा ‘कुरबतखान’ या दमदार व्यक्तिरेखेत दिसतो आहे. त्याने या चित्रपटाबद्दल एक पोस्ट शेअर करत लिहिले आहे कि, ‘मुलांना स्पायडरमॅन कळायला हवा, पण घोरपडीच्या सहाय्याने गड चढणारा “तानाजी मालुसरे” आधी कळायला हवा. मुलांना स्पार्टन- ३०० ची गोष्ट कळायला हवी, पण पावनखिंडीवर बाजीप्रभू देशपांडेंसह प्राणांची आहुती देणारे “३०० मावळे” आधी कळायला हवेत. लढाई जिंकून देणारा महाबली हल्क मुलांना माहित हवा, पण शौर्य आणि इमान यांच दुसरं नाव असलेले सरसेनापती “हंबीरराव मोहिते” आधी कळायला हवेत’.

View this post on Instagram

A post shared by Kushal Badrike (@badrikekushal)

पुढे लिहिलंय, ‘आयर्न मॅन ची गोष्ट मुलांना आपण सांगायलाच हवी, पण लोखंडाच्या सळ्यांनी डोळ्यांच्या खाचा झाल्या तरीही एकही हुंदका न देणारे आपले “छत्रपती संभाजी राजे” आधी कळायला हवेत. कॅप्टन अमेरिकेच्या नेतृत्वाला लाजवील असं आपल्या “छत्रपती शिवाजी महाराजांचं” नेतृत्व मुलांच्या मनातच नाही तर रक्तात भिनायला हवं. आपले सुपरहिरोज मुलांना आधी कळायला हवेत. यावेळी आम्ही घेऊन आलोय आपल्या अशाच “7सुपरहिरो” ची कहाणी…. वेडात दौडलेल्या त्या “सात वीरांची” गोष्ट सरसेनापती “प्रतापराव गुजर” आणि सोबतीच्या “सहा मावळ्यांची” गोष्ट, मुलांना ही गोष्ट बघायला नक्की घेऊन या. सिनेमा :- “राव रंभा” आपल्या जवळच्या चित्रपटगृहात’.

Tags: Famous Marathi ActorInstagram Postkushal badrikeRavrambhaviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group