Take a fresh look at your lifestyle.

‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेता मिलिंद गवळीच्या लेकीची पहिली वहिली ओळख; व्हिडीओ आला समोर

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छोट्या पडद्यावरील स्टार प्रवाह या वाहिनीवर प्रसारित होणारी ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने कमी वेळात अधिक लोकप्रियता मिळवली आहे. या मालिकेतील सर्व पात्रांनी रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. या मालिकेतील कलाकार सोशल मीडियावर वेगवेगळ्या कारणामुळे सातत्याने चर्चेत येत असतात. मालिकेतील अनिरूद्ध उर्फ अभिनेता मिलिंद गवळी सोशल मीडियावर अतिशय सक्रीय आहे. या माध्यमातून तो चाहत्यांना सर्व अपडेट देत असतो. आज त्याच्या लेकीचा वाढदिवस असून आज पहिल्यांदाच त्याच्या लेकीची ओळख माध्यमांना झाली आहे. त्याने इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेता मिलिंद गवळीने आपल्या लाडक्या लेकीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिच्या बालपणापासून आतापर्यंतच्या अनेक फोटो आणि व्हिडीओंचा एक सुंदर कोलाज केला आहे. हाच कोलाज त्याने आपल्या अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्रामवर अकाउंटवर शेअर केला आहे. त्याने व्हिडीओ शेअर करत लिहिले की वाढदिवसाच्या शुभेच्छा. तू माझा प्राण आणि तू माझी सनशाइन आहेस.

मिलिंद गवळीच्या मुलीचे नाव मिथिला आहे. मिथिला विवाहित आहे. तिचे २०१८ सालामध्ये लग्न झाले आहे. ती एक फिटनेस ट्रेनर असून द बॅलन्स मिथ नावाचे तिचे ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंट आहे.

जिथे ती लोकांना फिटनेसचे धडे देताना दिसते. याआधी कधी मिथिलाचे नाव माध्यमांमध्ये आले नव्हते. पण वाढदिवसाच्या निमित्ताने मिलींदकडून तिची ओळख करून देण्यात आलीच.

अभिनेता मिलिंद गवळी यांनी अनेक मराठी तसेच हिंदी चित्रपटात आणि मालिकांमध्ये काम केले आहे. या व्यतिरिक्त त्यांनी दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. शूर आम्ही सरदार, हे खेळ नशिबाचे, आधार, वैभव लक्ष्मी, सून लाडकी सासरची, सासर माझे मंदिर यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये तर चंचल, वक्त से पहेले, हो सकता है यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये मिलिंद गवळी झळकले आहेत. हिंदीमध्ये त्यांनी कॅम्पस, सीआयडी, आहट, कहानी तेरी मेरी यांसारख्या मालिकांमध्ये खूप उठावदार भूमिका केल्या आहेत. त्यानंतर बऱ्याच काळाने ते आई कुठे काय करते मालिकेत झळकले आणि त्याचे पात्र त्यांनी अगदी साजेसे निभावले आहे.