Take a fresh look at your lifestyle.

‘सगळं पूर्ववत होऊ दे बाबा’; प्रशांत दामलेंची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कधी खवय्ये, कधी गवय्ये, कधी अभिनेता, कशी महाराज अशी ख्याती असलेले अभिनेते प्रशांत दामले हे आजकाल सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. ते नेहमीच काही ना काही पोस्ट करून चाहत्यांच्या संपर्कात राहतात. नुकतीच त्यांनी एक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी कोरोनापूर्व काळाची आठवण येत असल्याचे म्हणते आहे. शिवाय सगळं पूर्ववत होऊ दे बाबा लवकर अशी देवाकडे प्रार्थना देखील केली आहे. दामलेंची हि पोस्ट चांगलीच चर्चेत अली आहे.

मराठी अभिनेता प्रशांत दामले यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया फेसबुक हॅण्डलवरून हि पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये प्रशांत दामले यांनी लिहिले आहे कि, “नाटक संपल्यानंतर तुमच्या बरोबर फोटो काढणं, तुमच्या बरोबर गप्पा मारणं, तुमच्या सूचना ऐकणं हे सगळंच मी मिस करतोय.. पण आपण रिस्क घेऊ शकत नाही. हा कोरोना आणि ही बंधन कधी संपत्यात असं झालंय…सगळं पूर्ववत होऊ दे बाबा लवकर”. अशा आशयाची फेसबुक पोस्ट प्रशांत दामले यांनी केली आहे.

प्रशांत दामले यांची हि पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. इतकेच नव्हे तर या पोस्टवर अनेक चाहत्यांनी एकापेक्षा एक भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. यात एका “मी आज तुमच्या नाटकाला आलो होतो पण तुमच्या आवाहनानंतर आम्हीही नियमांचं पालन करतो आहोत आणि त्याचमुळे तु्मची भेट घेणं टाळलं. आम्हीही तुम्हाला भेटणं मिस करतोय.”तर आणखी एकाने कमेंट करीत लिहिलं कि, आम्हीही ते सगळे दिवस मिस करतोय. देव करो कोरोना लवकर जाऊदे. सध्या प्रशांत दामले आणि कविता लाड यांचं एका लग्नाची पुढची गोष्ट हे नाटक हाऊसफुल आहे तर लवकरच प्रशांत दामले आणि आणि वर्षा उसगावकर एकत्र ’सारखं काहीतरी होतंय’ या नव्या नाटकात दिसतील. या नाटकाचं लेखन आणि दिग्दर्शन अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने केलं आहे.