Take a fresh look at your lifestyle.

नव्याकोऱ्या वर्षातही ताठ मानेने जगता यावं; अभिनेता संकर्षण कऱ्हाडेचा कवी अंदाज चर्चेत

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| नुकतेच २०२१ हे वर्ष सरले असून नवे वर्ष २०२२ आले आहे. जगभरात यासाठी एक नवा जल्लोष एक नवा उत्साह दिसून येत आहे. असे असताना अनेक सेलिब्रिटींनी आपल्या युनिक आणि हटके स्टाईलने आपल्या चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये मराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याचाही समावेश आहे. संकर्षण याने आपल्या फेसबुकवरून चाहत्यांना काव्यमय शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेता संकर्षण कऱ्हाडे हा नेहमीच आपल्या सोशल मीडिया हँडलवर मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याचे दिसतो त्यामुळे नेहमीच आपल्या कवी अंदाजाने तो प्रत्यय देताना दिसतो. त्यामुळे यावेळी त्याने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं की, घडलं जे जे छान .. त्याचा नम्रपणे स्विकार.. नव्हतं पटलं जे .. त्याचा नकोच उगा विचार .. आनंदाला माझ्याकडे , आनंदाने येता यावं ….. नव्या कोऱ्या वर्षातही , ताठ मानेने जगता यावं ..२०२२ ह्या नवीन वर्षासाठी खूप खूप शुभेच्छा! संकर्षणच्या या पोस्टवर त्याचे सहकलाकार मित्र, परिवार, चाहते सर्वांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालंच तर तो सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘ माझी तुझी रेशीम गाठ ‘ या मालिकेत समीर हे पात्र साकारत आहे. त्याचे हे पात्र चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. मुख्य म्हणजे छोट्या पडद्यावरील ही मालिका अत्यंत लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मलिकेमध्ये मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री प्रार्थना बेहरे मुख्य भूमिकेत दिसत आहेत. तर संकर्षण श्रेयसच्या मित्राच्या भूमिकेत दिसत आहे.