Take a fresh look at your lifestyle.

माझी तुझी रेशीम गाठ! श्रेयस तळपदे पुन्हा झळकणार मालिकांच्या विश्वात; पहा प्रोमो

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता श्रेयस तळपदे ‘आभाळमाया’, ‘बेधुंद मनाची लहर’ आणि अवंतिका अशा लोकप्रिय मालिकांचा भाग होऊन गेला आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा तो मराठी टेलिव्हिजनवर परत येत आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही त्याची आगामी मालिका असून या मालिकेचा पहिला प्रोमो झी मराठीच्या ऑफिशियल पेजवर रीलीज करण्यात आला आहे. ही मालिका लवकरच झी मराठी ह्या अत्यंत लोकप्रिय मराठी वाहिनीवर प्रसारित केली जाणार आहे. ही मालिका एक लव्ह स्टोरी असून तरुणाईसाठी आकर्षण ठरणार आहे.

नुकताच या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे चाहत्यांची श्रेयसला पुन्हा एकदा मालिकेत पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या प्रोमोत श्रेयस एका रेस्टॉरंटमध्ये एका चिमुकलीसोबत बसलेला दिसतोय. पण त्याचं लक्ष मात्र भलतीकडेच असल्याचे दिसतेय. ही नवी मालिका कोणत्या वेळेत प्रसारित होणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याशिवाय मालिकेत अन्य कोणती पात्रे असतील हेही अद्याप अस्पष्ट आहे.

अभिनेता श्रेयस तळपदे मोठ्या ब्रेकनंतर लहान पडद्यावर दिसणार आहे. त्यामुळे त्याच्या विरूद्ध कोण अभिनेत्री असेल हे मात्र या प्रोमो मध्ये गुलदस्त्यात ठेवल्यामुळे याबाबत वेगळीच उत्सुकता आहे. तर, श्रेयस सोबत दिसणारी ही चिमुकली मायरा आहे. युट्युब वर Myra’s Corner या चॅनलद्वारा ती सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. दरम्यान झी मराठी कडून ‘माझी तुझी रेशीमगाठ’ सोबत आज ‘मन झालं बाजिंद’या अजून एका मालिकेचा प्रोमो लॉन्च करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.