Take a fresh look at your lifestyle.

क्रिकेटवरील प्रेमापोटी दुखापत झाली असतानाही, सिद्धार्थ जाधव करतोय खेळाचा सराव

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। महाराष्ट्राचा लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ जाधव म्हणजे चाहत्यांचा सिद्धू सध्या क्रिकेटचा सर्व करण्यात व्यग्र आहे. दरम्यान सिद्धार्थच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे. आता तुम्ही म्हणाल, कि सिद्धार्थ क्रिकेटचा सर्व का करतोय? अनेकांनी तर एव्हाना कितीतरी तर्कवितर्क लावले असतील. पण खरे कारण असे आहे, कि लवकरच मराठी इंडस्ट्रीची क्रिकेट टूर्नामेंट सुरु होणार आहे. त्यातील एका संघाचा सिद्धार्थ कर्णधार आहे. त्यासाठीचीच सराव मॅच सुरु असताना सिद्धार्थला ही दुखापत झाली आहे.

सिद्धार्थला झालेल्या दुखापतीत त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल चार टाके पडले आहेत. दरम्यान त्याच्यावर त्वरित उपचारही करण्यात आले. मात्र उपचार घेऊन आराम करेल तो सिद्धार्थ कसला? उपचार झाल्या झाल्या क्षणही न घालवता हा पठ्ठया सरळ हातात बॅट पकडून सरावाला लागला. यावरूनच कळतं कि, सिद्धार्थचे अभिनयासोबतच क्रिकेटवरही किती प्रेम आहे.

सिद्धार्थ नेहमीच आपले क्रिकेटप्रेम सोशल मीडियावरून व्यक्त करीत असतो. पहिल्यांदा स्टेडियममध्ये पाहिलेल्या सचिनच्या मॅचचा अनुभव त्याने चाहत्यांसोबत शेअर केला होता. क्रिकेट खेळण्याची एकही संधी सिद्धार्थ काही सोडत नाही. क्रिकेट की आराम असा पर्याय दिल्यावर क्रिकेटला प्राधान्य देणारा आपला सिद्धू लवकर बरा होऊन टुर्नामेंट मध्ये रंजक खेळी खेळताना दिसो.

Leave A Reply

Your email address will not be published.