Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘..तू राउतांच्या भाषेत यड ** आहेस’; ‘त्या’ पोस्टमुळे स्वप्नील जोशी झाला ट्रोल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 25, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Swapnil Joshi
0
SHARES
34
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या सोशल मीडियाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीबाबत नाराजीचं वातावरण दिसून येत आहे. बॉलिवूडचे कलाकार, बॉलिवूडचे चित्रपट सगळं काही प्रेक्षकांना नकोसं झालं आहे. बॉलीवुडमधील गढूळ वातावरण या रोषाला कारणीभूत आहे. अलीकडे प्रदर्शित झालेला ‘लाल सिंग चड्ढा’ आणि ‘रक्षाबंधन’ हे चित्रपट चांगलेच आपटले. यानंतर बॉयकॉट बॉलिवूड असा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला आहे. हा ट्रेंड आता संपणार नाही तर बॉलिवूड संपेल असेही अनेकांनी म्हटले. या प्रकारामुळे बॉलिवूडचा मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. अशातच मराठी अभिनेता स्वप्नील जोशीने एक पोस्ट शेअर केली आहे. जी पाहून त्याच्यावरही बहिष्काराचे संकट येतं का काय..? अशी भीती वाटू लागली आहे.

अभिनेता स्वप्नील जोशी हा मराठी सिनेइंडस्ट्रीतील लाडका अभिनेता आहे. तो सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो आणि विविध पोस्ट शेअर करताना दिसतो. सध्या स्वप्नील जोशीने बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि अर्जुन कपूर यांच्यासोबतचा एक फोटो अधिकृत सोशल मीडिया हॅण्डलवर शेअर केला आहे. सोबत एक कॅप्शनही लिहिले आहे. त्याने लिहिलं आहे कि, ‘सिंपल, रियल, मॅजिकल.. तुम्ही लोक जे कोण आहात त्याचं कारण तुम्हीच आहात.. खऱ्या अर्थाने सुपरस्टार… अर्जुन कपूर आणि रणवीर सिंह तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी धन्यवाद!’ स्वप्नीलची हि पोस्ट पाहून नेटकरी प्रचंड चिडले आहेत आणि या नादात ते स्वप्नीलला ट्रोल करताना दिसत आहेत.

अभिनेता स्वप्नील जोशीच्या फेसबूक पोस्ट नेटकऱ्यांच्या टीकाकार कमेंटचा नुसता धो धो वर्षाव सुरु आहे. एका नेटकऱ्याने लिहिले आहे कि, ‘स्वप्नील तुलाही बॉयकॉट व्हायचंय का?’, तर आणखी एकाने लिहिले आहे कि, ‘आजपासून मी स्वप्नीलचा एकही चित्रपट पाहणार नाही’. याशिवाय आणखी एकाने लिहिलंय कि, ‘यालाच म्हणतात उडता तीर आपल्याच हाताने G घालून घेणे..’.

तर अन्य एका नेटकऱ्याने लिहिले कि, ‘सुपरस्टार आणि अर्जुन कपूर.. असं असेल तर तू राउतांच्या भाषेत यड** आहेस..’ इतकेच नव्हे तर एकाने म्हटलं आहे कि, ‘जर south सोडले तर हे सगळे एकाच माळीचे मनी आहेत…घर गड्याचा रोल मिळेल एवाडीच अपेक्षा करायची,कशाला किंमत कमी करुन घेतय..’ एकंदरच नेटकऱ्यांचा रोष पाहता हे प्रकरण स्वप्नीलला जड जाणार असे दिसत आहे.

Tags: Arjun KapoorFacebook Postranveer singhSocial Media Trollingswapnil joshiviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group