Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘बाबा म्हणजे भावना…’; मराठमोळ्या अभिनेत्यांनी मुलांसोबत साजरा केला ‘फादर्स डे’

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 19, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, लाईफस्टाईल, सेलेब्रिटी
Fathers Day
0
SHARES
31
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| बाबा या शब्दात जेव्हढा धाक असतो तेवढं प्रेम, आदर आणि तितक्याच अबोल भावना असतात.. हे नातं जबाबदारीच असल तरीही सुखावणारं असत. गेल्या काही काळात अनेक कलाकारांनी रील नव्हे तर रियल आयुष्यात बाबा होण काय असत हे अनुभवल आहे. याच बाबापणाबद्दल बोलण्यासाठी आजचा दिवस औचित्य ठरलाय. आज फादर्स डे निमित्त मराठी अभिनेत्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Aroh Welankar (@arohwelankar)

अभिनेता आरोह वेलणकर म्हणतो की, बाबा झाल्यावर मी अधिक जबाबदार तर झालोच; पण त्याचबरोबर मी खूप भावनिकही झालो. अर्जुनचा जन्म आमच्यासाठी खूप आनंद देणारा क्षण होता. हा प्रवास खूप काही शिकवणारा आहे. नवनवीन आव्हानं पेलायलादेखील तितकीच मजा येतेय. मी आणि माझी बायको अनेक गोष्टी अजूनही शिकतोय. कोणीतरी मला बाबा म्हणणार आहे ही भावना सुखावह आहे. सध्या विविध कामांमुळे त्याला जास्त वेळ देता येत नसला तरीही माझा इतर मोकळा वेळ हा फक्त त्याचाच असतो.

View this post on Instagram

A post shared by sangram (@sangramsalvi)

तर अभिनेता संग्राम साळवी म्हणतोय की, राघवचा जन्म झाल्यानंतर सगळ्या गोष्टींकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोनच बदलून गेला. माझ्याकडे बघून कोणीतरी शिकणार आहे, मी कोणाचा तरी सुपरहिरो असणार आहे आणि इतकी वर्षं मी कोणाला तरी बाबा म्हणत होतो; पण आता मला कोणीतरी बाबा म्हणणार आहे या सगळ्या भावना प्रचंड समाधान देणाऱ्या आहेत. मला ओरडणारा किंवा लाड करणारा बाबा यापेक्षा रघवचा मित्र बाबा व्हायचंय. राघव हा माझा सगळ्यात लहान बेस्ट फ्रेंड आहे.

याशिवाय अभिनेता सचिन देशपांडे म्हणाला की, माझी लेक मीरा लॉकडाउनमध्ये जन्माला आली. त्यावेळी चित्रीकरणाच्या निमित्तानं मी बरेच महिने बाहेर होतो. तिच्याबरोबर फारसा वेळ घालवता आला नाही; त्यामुळे यावर्षी खऱ्या अर्थानं माझा पहिला फादर्स डे आहे. गेल्या एक-दोन महिन्यांपासून मी तिला जास्तीत जास्त वेळ देतोय. मीरा झाल्यापासून एक मजेशीर बदल म्हणजे सध्याची गाणी सोडून मी फक्त लहान मुलांची बडबड गीतं गुणगुणायला लागलो आहे. अनेकदा पाहिलेल्या चित्रपटांमधील बापलेकीच्या हळव्या क्षणांचा खरा अर्थ आता कळतोय.

View this post on Instagram

A post shared by Ankit Mohan (@ankittmohan)

तर अभिनेता अंकित मोहन म्हणाला की, बाबा हा फक्त एक शब्द नाहीय. ती एक भावना आहे, जबाबदारी आहे आणि सुखावणारी गोष्ट आहे. रुआनच्या जन्मापर्यंत आणि जन्मानंतरही रूचीनं मला नेहमीच साथ दिली. आम्ही दोघंही एकमेकांच्या साथीनं पुढे जातोय आणि नवनवीन गोष्टी शिकतोय. बाबांना येणारी आव्हानं, सामोरं जायला लागणाऱ्या गोष्टी या सगळ्याची जाणीव होतेय. कामाचं महत्त्व कमी झालं नसलं तरी आता माझा मोकळा वेळ हा त्याच्याबरोबर घालवण्याचा मी प्रयत्न करत असतो. रुआनला कणखर बनवायचं आहे.

Tags: Ankit MohanAroh VelankarFathers DayMarathi ActorsSangram Salvi
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group