Take a fresh look at your lifestyle.

कोण आहे केतकी चितळे..? तिची लायकी काय..?; मराठी सिनेसृष्टीतून अभिनेत्रीवर टीकांची बरसात

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्याबद्दल अपमानकारक आणि आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केल्यामुळे मराठी अभिनेत्री केतकी चितळे सध्या पोलीस कोठडीत आहे. फेसबुकवर पोस्ट करताना कोणत्याही शब्दांचे भान न राखता केलेल्या या पोस्टमुळे केतकी चांगलीच अडचणीत सापडली आहे. दरम्यान न्यायालयात हजार केल्यानंतरही ती आपल्या भूमिकेवरून हटायला तयार झाली नाही आणि त्यामुळे तिला १८ मे अर्थातच बुधवारपर्यंत कोठडी सुनावण्यात आली. यानंतर ठाणे गुन्हे शाखेचे अधिकारी कारवाई करताना त्यांनी तिचा लॅपटॉप आणि ३ मोबाईल जप्त केले आहेत. केतकीच्या कृत्यावर सध्या सर्व स्तरांवरून रोष व्यक्त केला जातोय. दरम्यान कोणताही कलाकार केतकीच्या कृत्याचे समर्थन करीत नसल्याचे प्रत्येकाने व्यक्त केले आहे.

केतकीने तिच्या फेसबुक हँडलवर पवारांविषयी आक्षेपार्ह पोस्ट करताना ऍडव्होकेट नितीन भावे यांच्या पंक्ती असल्याचा उल्लेख केला आहे. मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांनी केतकीवर टीका केल्या आहेत. आसावरी जोशी, सविता मालपेकर, दीपाली सय्यद, मानसी नाईक आणि आदेश बांदेकर यांच्यासह अशा अनेक कलाकारांनी केतकीच्या कृत्याचा निषेध व्यक्त केला आहे. आदेश बांदेकर म्हणाले कि, संस्कार आणि संस्कृती विसरून विधानं करणाऱ्यांबद्दल मला काहीच बोलायच नाही. ज्येष्ठांचा आदर राखणं फार गरजेचं आहे आणि ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्यामुळे याविषयी मी काहीही बोलू इच्छित नाही.’

तर अभिनेत्री मानसी नाईक म्हणाली कि, खरं तर मी जेव्हा हे वाचलं तेव्हा वाईट वाटले. कारण आपण मराठी आहोत. आणि आपण मराठी कलाकारांनी अशा प्रकारे कुणाबाबतही असं बोलणं चुकीचे आहे. ते लज्जास्पद आहे. मला ते आवडलं नाही. तिचे ते बोलणं. आपण सगळे शरद पवारांना ओळखतो. देशातच नव्हे तर बाहेर जगातही त्यांची वेगळी ओळख आहे. पवारांविषयी असं बोलणं वाईट आहे. केतकी जे बोलली त्यासाठी तिला कठोर शिक्षा व्हायला पाहिजे. वडिलधाऱ्या माणसांबद्दल कुणीच असं बोलता कामा नये. ज्यांनी कुणी अशाप्रकारे प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी दोनदा विचार करायला पाहिजे. आपण काय बोलतो आहोत याविषयी भान ठेवणे गरजेचे आहे.

तर सविता मालपेकर म्हणाल्या, “तिची पोस्ट वाचल्यानंतर आणि ऐकल्यानंतर माझा संताप होत आहे. कोण आहे केतकी चितळे. काय लायकी आहे तिची. एक दोन मालिका केल्या, त्यातही धड काम टिकवता आल नाही. हिमालयाएवढ कर्तृत्व असलेल्या माणसाविषयी आपण काय बोलतोय हे कळायला हवं. तुझा बोलविता धनी तर आम्ही शोधून काढूच पण तुझाही समाचार घेऊ.’ शिवाय ‘नाही तिला पवार साहेबांच्या पायाशी आणलं तर .. असा संतापही व्यक्त केलाय. याशिवाय अभिनेत्री आसावरी जोशी यांनीही तिच्या पोस्टचा आणि तिच्या विचारांचा निषेध करीत व्हिडीओ पोस्ट केली आहे. अशाप्रकारे संपूर्ण सिनेसृष्टीतून केतकीवर संताप व्यक्त केला जात आहे.