हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। संपूर्ण राज्यात कोरोना नामक विषाणूने थैमान घातले असताना अनेक लोकांचे प्राण जात आहेत. कोरोनाचा हा वाढत संसर्ग रोखण्यासाठी शासनाने कडक निर्बंधांसहित लोकडाऊन लावला आहे. मातृतारीही रुग्णांची संख्या काही कमी होईना. अश्या परिस्थिती वैद्यकीय सुविधांवर आलेला ताण लोकांना आणखीच हवालदिल करीत आहे. सर्वत्र निराशाजनक वातावरण पसरले आहे. अनेक कलाकार जनतेला घरात राहा, सुरक्षित राहा म्हणत आवाहन करत आहेत. असेच आवाहन करीत अभिनेत्री अपूर्व नेमळेकरने चाहत्यांशी संवाद साधला आहे. “हे ही दिवस जातील …. सरी सुखाच्या येतील” असे दिलासा देणारे कॅप्शन देखील तिने दिले आहे.
अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने व्हिडीओमध्ये तिने प्रेक्षकांशी संवाद साधताना म्हटले आहे कि,.. आणि पुन्हा एकदा आपण थांबलो, आता आपल्याला थांबावच लागेल. कारण सांगू शकत नाही बोलू शकत नाही कित्येक वाईट प्रसंग कित्येक कुटुंबाना सामोरे जावे लागले.देव त्या सगळ्या परिवांना शक्की आणि बळ देओ. सगळ्यांचेच रक्षण करो. काय होतंय ना रोज आपल्या कानावरती खूप वाईट बातम्या येतात. त्यामुळे आपण आणखी हतबल होतोय घाबरून जातोय. पण घाबरू नका. ही वेळ सुद्धा निघून जाईल. शेवटी आपली सुरक्षा ही आपल्याच हातात आहे.
पुढे ती म्हणाली, वेळोवेळी स्वच्छ हात धुवा, सॅनिटाईझरचा वापर करा, मास्क लावा आणि तुमची इम्युनिटी कशी वाढेल याकडे लक्ष द्या. श्रीकृष्णनेही भगवती गीतेत सांगितले आहे. कमजोर तुम्ही नाही, तुमची वेळ आहे. तुमचं जीवन हे ना तुमच्या भविष्यात आहे ना तुमच्या अतितमध्ये.ते आहे या क्षणामध्ये तर हा क्षण जपा.घराबाहेर उगाचच पडू नका, स्वतःची काळजी घ्या, तुमच्या घरच्यांचीही काळजी घ्या. सुरक्षित रहा. अपूर्वाने तिच्या परीने सर्व नागरिकांना कोरोना विषाणू बद्दल जागरुक राहण्याचे तसेच नियमांचे पालन करण्याचे आवाहन या व्हिडिओद्वारे केले आहे.