Take a fresh look at your lifestyle.

लवकरच भार्गवी दिसणार मेरे साई मालिकेमध्ये, साकारणार हि भूमिका

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी टीव्हीवरील “मेरे साई- श्रद्धा और सबुरी” या मालिकेत लवकरच ‘भार्गवी चिरमुले’ हि मराठी नायिका दिसणार आहे. या मालिकेतील साईंची मध्यवर्ती भूमिका प्रसिद्ध कलाकार तुषार दळवी साकारत आहेत. आता मालिकेतील पुढील कथानकासाठी भार्गवीचा सहभाग मोलाचा ठरणार आहे. भार्गवीने अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांतील विविध भूमिकांमध्ये काम केले आहे. आता ती मेरे साई या मालिकेत लवकरच एका मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

भार्गवी या मालिकेत ‘चंद्रा बोरकर’ नावाची व्यक्तिरेखा साकारणार आहे, जी साईंची बहीण आहे आणि दोन मुलं असलेले तिचे सुखी कुटुंब आहे. मात्र ध्यानीमनीही नसताना तिचा नवरा ज्ञानप्राप्तीसाठी आपल्या कुटुंबाला सोडून निघून जातो. मुख्य म्हणजे कुटुंबाप्रती असलेल्या जबाबदार्‍या म्हणजे त्याला आपल्या मार्गातला अडथळा वाटू लागल्याने तो निघून जातो. त्यामुळे चंद्रावर ओढवलेल्या परिस्थितीमुले ती खचू लागते. साई आपल्या बहिणीच्या पाठीशी उभे राहतात आणि चंद्राच्या पतीला ही जाणीव करून देतात की, आपल्या जबाबदार्‍या पूर्ण केल्यावरच खरी ज्ञानप्राप्ती होत असते.

आपल्या भूमिकेबद्दल बोलताना भार्गवी म्हणाली, “मेरे साई मालिकेतल्या या महत्त्वाच्या कथानकात सहभागी होता आल्याचा आणि साईंच्या बहिणीची भूमिका साकारण्याचा मला आनंद आहे. मला वाटते की, मेरे साई ही भारतीय टेलिव्हिजनवरील सगळ्यात जास्त प्रसार असलेली मालिका आहे आणि ती सकारात्मकता पसरवते. त्यात जे मुद्दे कथानकाच्या माध्यमातून हाताळण्यात येतात, ते आजच्या काळाशी देखील इतके संबद्ध आहेत की, प्रेक्षकांना प्रत्येक कथेतून काही ना काही बोध मिळतो.

साई बाबांनी स्त्री-पुरुष असा भेद कधीच केला नाही. ते नेहमी खर्‍याच्या बाजूनेच उभे राहिले. या आगामी कथेत देखील हेच पुन्हा दिसून येणार आहे. यामध्ये ते चंद्राच्या पतीला ही जाणीव करून देतील की, महिला पुरुषांपेक्षा कोणत्याच बाबतीत कमी नसतात.” पुढे ती म्हणाली, “या भूमिकेच्या माध्यमातून साईंनी माझ्यावर त्यांच्या आशीर्वादाचा वर्षाव केला आहे.” आपल्या पतीने आणि कुटुंबाने सोडून दिलेल्या स्त्रीला आपल्या समाजात किती त्रास सोसावा लागतो, याचे चित्रण या भागात दिसेल

Leave A Reply

Your email address will not be published.