Take a fresh look at your lifestyle.

हॅपी बर्थडे कवी! ‘Aunty’ म्हटल्यावर न चिडण्याचं वय झालंय; हेमांगीने दिली खऱ्याखुऱ्या वयाची कबुली

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलीकडेच बाई, बुब्स आणि ब्रा अश्या कधीही न बोलल्या जाणाऱ्या विषयावर रोखठोक बोलणारी अभिनेत्री हेमांगी कवी चांगलीच चर्चेत आली. आपली मतं आणि आपले विचार स्पष्ट आणि शुद्ध भाषेत मांडण्याची विशेष कला हेमांगीमध्ये आहे. त्यामुळे सोशल मीडिया असो किंवा मग माध्यमांमधली मुलाखत.. हेमांगी कवी सगळीकडे आणि सगळ्यांवर भारी पडते. हेमांगीने आपल्या अभिनय शैलीच्या जोरावर मनोरंजन क्षेत्रात स्वतःची अशी वेगळीच ओळख निर्माण केली आहे. नाटक, मालिका आणि अगदी चित्रपट या माध्यमातून तिने विविध धाटणीच्या भूमिका साकारल्या. सांगायचे असे कि, आपली अभिनय शैली वापरून प्रेक्षकांच्या डोळ्यात कधी आंसू तर चेहऱ्यावर कधी हसू आणणाऱ्या या बहुगुणी आणि धाकड अभिनेत्रीचा आज वाढदिवस आहे. मुख्य म्हणजे तिने स्वतःच्या वाढदिवशीसुद्धा सोशल मीडियावर एक भारी मजेशीर आणि आटोपशीर पोस्ट लिहिली आहे.

एखादी व्यक्ती फेमस असेल तर गूगल महाराज त्याचा बायोडेटा काढून ठेवतात, हे आपण जाणतो. पण अनेकदा या बायोडेटामध्ये कितीतरी चुका असतात. अशीच एक चूक हेमांगीच्या बाबतीत झाली आहे. पण आजची हेमांगीची पोस्ट पाहिल्यावर कदाचित गूगल महाराज पण बर्थडे गर्लला सॉरी म्हणतील. कारण गुगलने सांगितल्याप्रमाणे हेमांगीची जन्मतारीख २६ ऑगस्ट १९८८ आहे. अर्थात आज ती ३३ वर्षांची असायला हवी. पण त्याच झालं असं कि, हेमांगीनेच आज आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून आपल्या खऱ्याखुऱ्या वयाची कबुली दिली आहे. हेमांगीने या संदर्भात एक भारी मजेशीर पोस्ट लिहिली आहे.

अभिनेत्री हेमांगी कवीने स्वतःच्याच वाढदिवसासाठी एक खास पोस्ट लिहिताना म्हटले आहे कि, हॅपी ४१स्ट टू मी. गूगल वर जन्मतारीख बरोबर आहे, पण सालाची (Birth Year) नोंद चुकीची आहे. याची कृपया मंडळाने नोंद घ्यावी! धन्यवाद! हॅशटॅग happybirthdaytome # जन्मदिन # वाढदिवस # चाळीशी # झालीचाळीशी # thatduskywoman # तीसावळीगं # कवीहुँमैं # हेमांगीकवी # kavihunmain # hemangikavi # auntykahona # augustborn # 26thAugust त.टी. : १ ते २० या वयोगटातील लोक अधिकृतपणे मला आता Aunty म्हणू शकतात! 😜😝 कारण ‘Aunty’ म्हटल्यावर न चिडण्याचं वय आता झालंय! 😮🤓

हेमांगीची हि पोस्ट पाहून सोशल मीडियावर नुसता हास्यकल्लोळ झाला आहे. याशिवाय हेमांगीच्या अनेको चाहत्यांनी तिला याच पोस्टवर ४१व्या वाढदिवसाच्या किलो किलोने शुभेच्छा दिल्या आहेत. हेमांगी जितकी सुंदर अभिनेत्री तितकीच सुंदर नृत्यांगना देखील आहे आणि याशिवाय ती एक भन्नाट कॉमिक अभिनेत्री आहे. त्यामुळे दिवस कोणताही आणि काहीही असो हेमांगी, तिच्या अदा आणि तिची भन्नाट कॉमेडी सुरूच असते. अश्या या सुंदर, बोल्ड, विचारी, परखड आणि कल्ला करणाऱ्या अभिनेत्रीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!