Take a fresh look at your lifestyle.

कोणी अर्ध नग्न असो किंवा..; पदरावरून कमेंट करणाऱ्या महिलेसह हेमांगीची रंगली फायर डिबेट

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री हेमांगी कवीला कोण ओळखत नाही. बाई, बुब्स आणि ब्रा या न बोलल्या जाणाऱ्या विषयावर हेमांगीने मांडलेले विचार आणि त्यानंतर झालेली चर्चा सर्वांच्याच लक्षात असेल. विविध मुद्द्यांवरून असो किंवा कपड्यांवरून असो हेमांगी ट्रोल होताना दिसतेच. पण सहन करेल आणि ट्रोल होऊ देईल ती हेमांगी कुठली? नेहमीच सडेतोड आणि आगपाखड करणारं उत्तर देताना हेमांगी सर्रास दिसते. असेच काहीसे याहीवेळी घडले आहे. त्याचे झाले असे कि दसऱ्यानिमित्त हेमांगीने मस्त नऊवारीतील फोटो शेअर केले पण एक महिला चाहतीने तिच्या होतोवर अशी काही कमेंट केली कि हेमांगीची तारच गेली. मग काय? दिले ना शालजोडीतून चपराक.

त्याचा झालं असं कि, हेमांगीने दसऱ्याच्या दिवशी नऊवारी साडीतील काही फोटो फेसबुकवर शेअर केले. तिच्या या फोटोवर अनेको चाहत्यांनी भारी कमेंट्स केल्या. पण एका चाहतीची कमेंट हेमांगीच्या डोक्यात गेली. हि कमेंट अशी होती कि, ‘खूप छान दिसतेस. साधेपणातलं तुझं सौंदर्य छानच. तुझे विचारही खूप छान आहेत. थोडंसं खटकलं- मराठमोळ्या पेहरावावर पदरही नीट घेतला असतास तर अजून छान दिसलं असतं. या कमेंटमधील पदर नीट घेतला असता तर…, हे वाक्य हेमांगीला अजिबात रुचले नाही आणि तिने शालजोडी चपराक द्यावा असा या महिलेचा क्लासच सुरु केला.

 

हेमांगीने रिप्लाय देत म्हटले कि, ‘पदर नीट घेतला असता म्हणजे? हे एक बाईच कसं बोलू शकते? याचं नवल वाटतं मला! ते ही तुमच्या सारख्या स्लीव्हलेस घातलेल्या बाई कडून यावं? मराठमोळ्या संस्कृतीत साडीवर स्लीव्हलेस कधी होता जरा सांगता का? माझं अज्ञान तेवढंच दूर होईल!. यानंतर महिलेने देखील पुन्हा प्रत्युत्तर देत म्हटले, एखाद्या वेळी तुझी एखादी गोष्ट नाही आवडली तर खिलाडू वृत्तीने घे. तुला दुखावण्याचा माझा अजिबात हेतू नाही… आता एवढ्यावर हे संपेल असे वाटतानाच हेमांगीने आणखी शब्द वाढवले. पुन्हा रिप्लाय देत ती बरसली.

 

हेमांगीने कमेंट केली कि, ‘नक्कीच, पण आपण बायका जिकडे लक्ष जाणार नाही किंवा लोकांच्या लक्षातही येणार नाही अशा गोष्टी का अधोरेखित करतो? आणि समजा लक्ष गेलंच तर तो त्यांच्या बघण्याचा दृष्टिकोन असू शकतो. आपण कितीही झाकून ठेवलं तरी ज्याला जे बघायचंय आणि विचार करायचाय तो करतोच. लोकांनी मला छानच म्हणावं असा माझा बिलकुल हट्ट नाही. पण नको त्या गोष्टी पॉईन्ट आऊट करणं हे कितपत योग्य. यानंतर हे संपते संपते म्हणता पुन्हा त्या महिलेने रिप्लाय केला व्यक्त होण्याचा हक्क असतोच.

यावर हेमांगीने तर कहरच केला आणि थेट महिलेच्या वस्त्रावरच टिका केली. म्हणाली, लक्षात आल्यावर ही न बोलणं उत्तम. आणि कोणी अर्ध नग्न असो किंवा पूर्ण कपडे घातलेले असो आपल्याला त्यावर बोलायचा काहीच हक्क नाही. तुम्हांला कुणाचं अर्ध नग्न वावरणं आवडत नसेल ही पण म्हणून ते चुकीचं नाही! They are comfortable in their own way. तसं पाहिलं तर sleeveless हे ही काहींच्या मते अर्ध नग्न असतं!.. बापरे बाप हे असेच कितीतरी वेळ सुरु राहिले पण दोघीही आपल्या मुद्द्यांवरून मागे हटल्या नाहीत.