Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

मराठमोळ्या मीराचा नवा विश्व विक्रम; जगातील सर्वाधिक उंचीवरील तुंगनाथ शिवमंदिरात केली नृत्य आराधाना

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 6, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठमोळी अभिनेत्री मीरा जोशी हि नेहमीच तिच्या वेगवेगळ्या कलागुणांमुळे चर्चेत असते. कधी तिच्या डान्समुळे तर कधी ग्लॅमरस फोटोंमुळे ती नेहमीच प्रेक्षकांचा भारावून टाकते. मात्र यावेळी ती एका अनोख्या कारणामुळे चर्चेत आहे. जगातील सर्वाधिक उंचीवर असलेल्या तुंगनाथ शिवमंदिरात नृत्य आराधना करीत तिने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. तुंगनाथ शिवमंदिरासमोर शिव वर्णम सादर करणारी मीरा जोशी ही पहिलीच अभिनेत्री आहे. तिच्या नृत्याविष्काराची नोंद ‘हाय रेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ आणि ‘इंडिया रेकॉर्ड’मध्ये झाली आहे.

View this post on Instagram

A post shared by Meera Joshi (@meerajoshi_)

उत्तराखंडच्या रुद्रप्रयागमध्ये असलेले तुंगनाथ शिवमंदिर हे जगातील सर्वाधिक उंचीवर असलेले मंदिर आहे. तुंगनाथ पर्वतावर असलेले हे शिवमंदिर ११ हजार ३८५ फूट उंचीवर आहे. मीराला अभिनयाबरोबर ट्रेकिंगची आवड आहे. १६ मार्च रोजी पहाटे ३ वाजता तिने चंद्रशीला शिखरावर ट्रेकिंगला सुरुवात केली होती. ती सूर्योदयाच्या वेळी शिखरावर पोहचली. त्यानंतर शिखराखाली असलेल्या प्राचीन तुंगनाथ शिवमंदिरासमोर मीराने नृत्य सादर करीत शिव आराधना केली.

View this post on Instagram

A post shared by Meera Joshi (@meerajoshi_)

मीरा जोशीने या यशाचे संपूर्ण श्रेय आईवडील आणि भावाला दिले आहे. याव्यतिरिक्त स्मित शाह, तुषार सुभेदार, चिंतन पांचाळ, आनंद बनसोडे या टीम सदस्यांचे आणि चाहत्यांचे तिने आभार मानले आहेत. तिने सांगितले की, मी भगवान शंकराची भक्त असून तुंगनाथ मंदिराला भेट द्यावी हे माझे स्वप्न होते आणि ते आता साकार झाले आहे. १६ मार्च रोजी तुंगनाथ मंदिर परिसरात बर्फ नव्हता. त्या संधीचा फायदा घेत मी नृत्य केले. खरे तर तापमान ६ डिग्रीपर्यंत होते. तिथपर्यंतचा प्रवास सोप्पा नव्हता. मात्र भगवान शिवशंकराच्या आशीर्वादाने माझे ध्येय पूर्ण झाले.

meera-anurag_201903208603

यापूर्वी मीरा फक्त मराठी वाहिनीवरील स्पेशल पोलीस फोर्स नामक मालिकेत झळकली होती. यात तिने एका सहाय्यक पोलीस अधिकारीची भूमिका बजावली होती. शिवाय मीरा ‘वृत्ती’ या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याबाबतची माहिती तिने स्वतःच्या सोशल मीडियावरून सांगितली आहे. या चित्रपटात ती अंजली नामक भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण उसरणी येथे पार पडले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन एस. अश्विन यांनी केले आहे. त्यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे.

Tags: Fakt MarathiHigh Range Book Of World RecordIndia RecordMeera JoshiUttarakhand Tungnath Shivmandir
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group