Take a fresh look at your lifestyle.

‘अन्न हे पुर्णब्रह्म..’ म्हणत प्राजक्ता माळीने केले चाहत्यांना हे आवाहन; फोटो झाला वायरल

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे महाराष्ट्रात कडक निर्बंधांसह लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. यामुळे राज्यातील चित्रीकरण बंद आहे. परिणामी बरेचसे कलाकार घरातच आहेत. हे कलाकार आपल्या कुटुंबियांसोबत निवांत असा वेळ व्यतित करत आहेत आणि सोबतच सोशल मीडियावर आपले डेली रुटीन चाहत्यांसह शेअर करीत आहेत. यांपैकी एक अभिनेत्री प्राजक्ता माळी हि सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. तिने नेहमीच वेगवेगळे फोटो शेअर करून चाहत्यांचे लक्ष ओढून घेते. तीने नुकताच एक खास फोटो ‘अन्न हे पुर्णब्रह्म..’ असे कॅप्शन देत इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

 

प्राजक्ता माळीने इंस्टाग्रामवर नऊवारी साडीतील फोटो शेअर केले आहेत. या फोटोसोबत तिने लिहिले आहे की, खाली बसून, मन लावून, ताजं अन्न,”अन्न हे पुर्णब्रह्म” हे आठवून खा. जशी आपली आजी-आजोबांची पिढी खाण्याबाबतीत नियम पाळायची, जे खायची, ते खा आणि निरोगी रहा. एकंदर या फोटोच्या माध्यमातून प्राजक्ताने आपल्या चाहत्यांना अन्नाचा अपमान करू नये असे थेट आवाहन केले आहे. सोशल मीडियावर प्राजक्ता माळीच्या या पोस्टने चाहत्यांसह अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. यामुळे तिच्या या पोस्टला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळते आहे.

 

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी बऱ्याचदा सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो आणि हटके लूकमुळे चर्चेत येत असते. तिच्या सर्व फोटोंना चाहत्यांची विशेष पसंती मिळत असते. प्राजक्ताने नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिनही माध्यमात काम केले आहे.

प्राजक्ता माळीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झालेच, तर सध्या ती महाराष्ट्राची हास्यजत्रा या मराठी कॉमेडी शोमध्ये सूत्रसंचालन करत आहे. तसेच तिने डिसेंबर महिन्यात ‘लकडाउन’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. या चित्रपटात तिच्यासोबत मराठी अभिनेता अंकुश चौधरी हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग पुण्यातील जुन्नर येथे पार पडले आहे. संतोष रामदास मांजरेकर हे या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत.