Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘ह्यांना माफी नाही.. कामचोर, बेजबाबदार.. शिक्षा झालीच पाहिजे’; मुख्यमंत्र्यांना टॅग करत अभिनेत्रीची सणसणीत पोस्ट

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 19, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
0
SHARES
141
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेत मुख्य पात्र असणाऱ्या अरुंधतीची सर्वात जवळची आणि लाडकी मैत्रीण म्हणजे देविका. हे पात्र अभिनेत्री राधिका देशपांडे साकारत आहे. राधिका सध्या ‘सियावर रामचंद्र की जय’ या बाल- महानाट्य’ प्रयोगात व्यस्त आहे आणि त्याचसोबत ती बालनाट्य शिबिरासाठी हॉल शोधत आहे. यानिमित्त तिने शासनाचा हॉल सवलतीच्या दरात मिळण्याकरता न जाणे कित्येक दिवस जोडे झिजवले आहेत. राधिकाच्या प्रयत्नांना योग्य साथ मिळत नसल्याचे सांगताना तिने कामचोर, बेजबाबदार कर्मचाऱ्यांमुळे येणार अडचणींबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. यातून तिचा होणार संताप स्पष्ट दिसून येतोय.

View this post on Instagram

A post shared by Radhika Deshpande (@radhika_deshpande)

राधिकाने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. धुळीने माखलेल्या फाईल्स, कागदपत्रे दिसत आहेत. याला कॅप्शन देत तिने सरकारी कामकाजावर संताप व्यक्त केलाय. राधिकाने लिहिलंय, ‘चार कागद, दोन सह्या, एक शिक्का!! ताजे टवटवीत फोटो आहेत, फोटो फाईल्समधून खेचून बाहेर काढले आहेत. खास व्हायरल मटेरियल आहेत. त्यामुळे फिल्टर्स मारायची गरज नाही. तुमच्या फोनमधे दिसल्यावर पेस्ट कंट्रोल करून घ्या. “देश बदल रहा है, तरक्की हो रही है”, ती खास करून शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांची. वाह! डोळ्यात पाणी आलं हो माझ्या दृश्य बघून. इतकी देखणी आरास मांडली होती, पायघड्या घातल्या होत्या माझ्या स्वागतासाठी’.

View this post on Instagram

A post shared by Radhika Deshpande (@radhika_deshpande)

‘विषय साधा होता. मी सध्या बालनाट्य शिबिर घेण्यासाठी हॉल शोधते आहे. मी आणि आमची संस्था काही मोठी नाही. सरकारी बाबू लोकांसमोर तर आम्ही चिल्लर पार्टी. थुकरट वाडीतील कोणीतरी “चल हट” म्हणून बाजूला करण्याजोगे. तसा फील देणारे एक्स्पर्ट मंडळी तुम्हाला भेटतील. तिथे पिसाळ आणि मोहिते आहेत त्यांनी मला उभं पण केलं नाही, बसा म्हणतील अशी अपेक्षा धरायला मी काही वेडी नाही. मूर्ख ठरू शकते कारण काम होईल अशी भाबडी आशा बाळगून मी गेले होते. २४ मार्चला अर्ज भरला, शिफारस केली, चकरा मारल्या पण दगडी माणसं सगळी, धुळीत काम करून मूठभर मास चढलेल्या माणसांवर काय परिणाम होणार? सध्या वरून कोणाचा आदेश पाळण्याची जबरदस्ती नाही, त्यासाठी खुर्चीचा आवाज होईल इतकी तरी हालचाल करावी लागते’.

View this post on Instagram

A post shared by Radhika Deshpande (@radhika_deshpande)

‘असो.. आज १८ एप्रिल. शासनाचा असलेला हॉल सवलतीच्या दरात मिळावा असे वाटले होते. पण ना आपणहून कागद हलले, ना कधी मिळेल हे कळले, ना भाडं किती बसेल हे सांगण्यात आले. काहीच घडले नाही. नाकावरची माशी हलली नाही का भुवया उंचावल्या नाहीत. कोण घेईल तेवढे कष्ट! मुजोरी तर राजवाड्यातल्या तिजोरी एवढी. खूप पाहिलेत, खूप भेटलेत, पण ह्यांना माफी नाही. कामचोर, बेजबाबदार कर्मचाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे. शासन केलंच पाहिजे. मी माघार घेतला, हार मानली नाही. माझी मुलं आणि मी नाटक करणार, हॉल मिळणार, दणदणीत प्रयोग आम्ही करणार पण माझ्या सकट बाल कलाकारांसाठी ज्यांनी हॉल उपलब्ध करून दिला नाही, त्रास नाही तर छळ केला त्यांना हे उद्याचे नागरिक धडा शिकावल्याशिवाय राहणार नाहीत. *मुद्दाम नाव घेऊन लिहिते आहे. ही माझी बाजू आहे. गोष्टीची दुसरी बाजू असू शकते’.

View this post on Instagram

A post shared by Radhika Deshpande (@radhika_deshpande)

‘चार कागद, दोन सह्या, एक शिक्का, असे तुमचेही अनुभव आहेत का? ढिगाऱ्यात कागद, सह्या, शिक्के, आशा, अपेक्षा, आकांक्षा… खितपत, कुजत, खुंटीवर लटकलेले सापडतील. त्यांचीच रचलेली होळी तुम्ही पहायची, पेटणार नाही कारण पेट घ्यायला काटक्या, रॉकेल, काडीपेटी ते आणताहेत, पण वेळ लागेल. सोपं वाटलं काय! एक करा. सगळ्यावर पाणी फेरा, नाहीतर तोंड उघडा, शाब्दिक का असेना एक बुक्का नक्की हाणा!!’. अशी पोस्ट शेअर करून राधिकाने शाब्दिक बुक्का हाणला असला तरीही प्रकाश पडण्याची शक्यता जरा कमीच आहे. दरम्यान राधिकाने ही पोस्ट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दिपक केसकर यांसह अनेकांना टॅग केली आहे. मात्र अद्याप कोणीही यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.. हे सत्य नाकारता येणारं नाहीये.

Tags: CM Of MaharashtraEknath ShindeInstagram PostMarathi Actressviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group