Take a fresh look at your lifestyle.

मुझे प्यार हो गया! अभिनेत्री राजेश्वरी खरातला चढली प्रेमाची झिंग; व्हिडीओ झाला वायरल

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। फॅन्ड्री चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या साध्याभोळ्या नजाकतने जिने अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलं.. जिच्या पिरतीचा इंचू झब्यापासून प्रत्येक तरुणाला चावला अशी शालू अर्थात मराठमोळी अभिनेत्री राजेश्वरी खरात आता स्वतःच प्रेमात पडलीये. राजेश्वरी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. त्यामुळे दररोज नवनवे फोटो व्हिडीओ शेअर करून ती चाहत्यांना भुरळ पाडत असते. चित्रपटात साधीभोळी दिसणारी शालू खऱ्या आयुष्यात मात्र अतिशय ग्लॅमरस आहे. त्यामुळे तिच्या चित्रपटांपेक्षा सोशल मीडियावरील पोस्टमुळे ती सारखी चर्चेत असते. आताही अश्याच एका पोस्टमुळे ती चर्चेत असल्याचे दिसत आहे. मुझे प्यार हो गया म्हणत तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे.

 

सोशल मीडियावर सक्रिय असल्यामुळे राजेश्वरीच फॅनफॉलोईंग जबरदस्त आहे. त्यामुळे तिचे फोटो असो नायतर व्हिडीओ ते व्हायरल होतातच. दरम्यान तिचा हा व्हिडीओ देखील वायरल झाला आहे. राजेश्वरीने हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओत राजश्रीने पांढरा रंग असलेला आणि त्यावर फुल असलेला शॉर्ट स्लिव्हलेज ड्रेस परिधान केला आहे. यात ती खूपच सुंदर दिसत आहे. तर ‘चोरी चोरी सपनों में आता है कोई’ या गाण्यावर राजेश्वरी थिरकताना दिसते आहे. हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, मुझे प्यार हो गया. यानंतर तिचा हा व्हिडीओ खूप वायरल होताना दिसत आहे.

 

राजेश्वरीचा हा व्हिडीओ पाहून तिच्या अनेको चाहत्यांनी विविध कमेंट केल्या आहेत. कुणी चांगल्या तर कुणी खोचक कमेंट करीत राजेश्वरीला ट्रोलही करण्याचा प्रयत्न केला आहे. या कमेंट्सपैकी लक्षवेधक कमेंट अशी कि एका युजरने कॅप्शनला अनुसरून लिहिले कि, ‘होणारच ना नमुनाच तसा आहे मी😍😂 ‘. याशिवाय इतर खोचक कमेंट्सपैकी अनेकांनी लिहिले कि, हिला काम द्या रे कुणीतरी..

राजेश्वरी खरातने नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘फॅन्ड्री’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटातून तिने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. त्यानंतर ती आयटमगिरी चित्रपटात दिसली होती. तर अलीकडेच तिचा आगामी चित्रपट रेडलाइटचे पोस्टर रिलीज झाले आहे. हा चित्रपट वैश्या व्यवसायावर आधारीत असून राजेश्वरी मुख्य भूमिकेत आहे त्यामुळे तिचे चाहते चित्रपटाविषयी अत्यंत उत्सुक आहेत.