Take a fresh look at your lifestyle.

राजेश्वरी खरातची बर्थडे स्पेशल पोस्ट; ‘वय विचारू नका, थोडी लाज वाटते’, पहा काय म्हणते बर्थडे गर्ल

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री राजेश्वरी खरात म्हणजेच प्रेक्षकांची आवडती शालू आज २४व्या वयात पदार्पण करतेय. तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या चाहत्यांनी सोशल मीडियावरून तिला शुभेच्छा दिल्या आहेत. या निमित्ताने तिनेही सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. ‘वय विचारू नका, थोडी लाज वाटते…’, असे लिहत तिने स्वतःला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिचा हा अंदाज प्रेक्षकांचा प्रचंड आवडला आहे. तसे पाहिले तर, राजेश्वरी तिच्या चाहत्यांसाठी वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ नेहमीच शेअर करत असते. पण आजचा दिवस तिच्यासाठी खास आहे. मग अश्या दिवशी चाहत्यांना विसरून कस चालेल? म्हणूनच तिने अनोख्या अंदाजात हि पोस्ट आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

या पोस्टमध्ये राजेश्वरीने तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच, तिने बऱ्याच गोष्टी या पोस्टमध्ये लिहिल्या आहेत. तिने लिहिले आहे, ‘Many Many Happy Returns Of The Day Dear Rajeshwari .. 🎂🥂☺️❤️ वय विचारू नका थोडी लाज वाटते परंतु अनुभवाबद्दल सांगायच झाल तर बर्‍याच प्रमाणात वाईट ही होता आणि खूप सार्‍या प्रमाणात चांगला ही होता. अनेक लोक भेटली कोणी आपले झाले कोणी काम झाल्यावर बाजूला झाले व कोणी अजूनही सोबत उभे आहेत. वेळ चांगली असो वाईट असो आपण सर्व माझ्यासोबत होता आणि आपण दिलेल्या प्रेमामुळे आज राजेश्वरी येथे पोहोचली आहे.

वैयक्तिक आयुष्यात राजेश्वरी कोण आहे कशी आहे याची कल्पना फार कमी लोकांना आहे. कधी नजर वर करून न चालणारी, आपल्या कामाशी काम ठेवणारी, कोणी काही बोललं तर ढसा ढसा रडणारी चष्मा लावून दोन वेण्या बांधुन सायकलवर शाळेला जाणारी खूप साधारण मुलगी होती राजेश्वरी. आयुष्यात एक मोठा बदल लिहलेला होता तो घडून आला आणि ती मराठी चित्रपटसृष्टी मध्ये झळकली. अभिनयाचा काहीच वारसा नसलेल्या त्या मुलीला सुरुवातीला माहिती नव्हते हे नवीन जग काय असतं. कोणी सांगितलं तसं करून पाहिले कधी स्वतःच्या मानाने करून चुका ही घडल्या आणि असेच चुकत चुकत बराच अनुभव आला.

लोकांची परख कशी करावी माहित नव्हते म्हणुन आयुष्यात अनेक ठिकाणी चुका घडल्या परंतु त्यातून जे काही शिकायला मिळाले ते पुढे फार उपयोगाचे ठरले. आज सरळ तोंडावर खरे बोलण्याच्या सवयीमुळे बर्‍याच कमी प्रमाणात लोकांना ती आवडते. अभिनेत्री म्हणाल्यावर कोणी कधी कोणती अफवा पसरवेल याचा नेम नाही परंतु हे सुद्धा सकारात्मकपणे सांभाळून आजसुद्धा राजेश्वरी आपल्या आयुष्यात खूप खुश आहे. इतर वेळी कधी बोलायला वेळ मिळत नाही, आज वाढदिवसानिमित्त थोडं बोलायला मिळाले.

असो, आपण सर्वांच्या प्रेमामुळे आज फार छान वाटल, काल रात्रीपासूनच फोन, मेसेज इतक्या प्रमाणात चालू झाले आहेत की काय सांगावे. परिस्थिती पाहता मी आज वाढदिवस साजरा करणार नाही, तरी माझ्या आग्रहाने आपन सर्वांनी थोडे थोडे तोंड गोड करून घ्या आणि जसे जमेल तसे आपली व आपल्या जवळच्यांची काळजी घ्या, मास्क लावा, विनाकारण बाहेर फिरू नका. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार आणि खूप खूप प्रेम.’ राजेश्वरीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चेत आली आहे. तर, तिचे चाहते देखील तिच्या या पोस्टवर भरभरून कमेंट करीत तिच्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि प्रेमाचा वर्षाव करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.