पुष्पा’च्या ‘श्रीवल्ली’वर आर्चीच्या अदांनी चाहत्यांना केलं क्लीन बोल्ड; व्हिडीओ झाला व्हायरल
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलीकडेच प्रदर्शित झालेला पुष्पा: द राईज हा तेलगू चित्रपट विविध भाषांमध्ये रिलीज झाला आहे. यानंतर या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावल्याने दिसून आले आहे. यानंतर बॉक्स ऑफिसवर प्रत्येक भाषेतील हा चित्रपट चांगलाच हिट गेला आहे. यामध्ये मुख्य भूमिकेत दाक्षिणात्य स्टायलिश सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदाना स्क्रीन शेअर करताना दिसत आहेत. या चित्रपटाचे कथानक, डायलॉग आणि गाणी तर इतकी लोकप्रिय झाली आहेत कि सोशल मीडियावर फक्त आणि फक्त याच गाण्यावरील रिल्स दिसत आहेत. यानंतर आता सैराट चित्रपटातील आर्ची म्हणजेच सर्वांची लाडकी अभिनेत्री रिंकू राजगुरूनेदेखील या चित्रपटातील श्रीवल्ली गाण्यावर अश्या काही अदा दाखवल्या आहेत कि बस्स चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे.
अभिनेत्री रिंकु राजगुरुने हा व्हिडीओ तिच्या सोशल मीडिया इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. तशीही ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असल्याचे दिसून येते. त्यामुळे तिचे चाहते आणि ती नेहमीच कनेक्ट असतात. त्यात रिंकूचे असे व्हिडीओ आणि कातिलाना अंदाज नेहमीच चाहत्यांना भुरळ पाडण्यात यशस्वी ठरतो.
यानंतर नुकताच शेअर केलेला श्रीवल्ली व्हर्जन व्हिडीओ पाहून अनेक तरुणांनी तर आपलं हृदय इथेच हरलं आहे. रिंकूच्या घायाळ करणा-या अदा आणि साडीत निखरलेले रूप अतिशय मोहक वाटत आहे. तिने या व्हिडिओमध्ये फुलाफुलांची सुंदर आकाशी रंगाची साडी नेसली आहे. यात ती टेरेसवर व्हिडीओ बनवते आहे.सध्या या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरु आहे.
रिंकू राजकगुरुच्या वर्क फ्रन्टबद्दल बोलायचं झालं तर, रिंकूने आपल्या कारकीर्दीतील पहिलाच चित्रपट चांगलाच गाजवला होता. हा चित्रपट म्हणजे अत्याधिक लोकप्रिय ठरलेला सैराट. मराठमोळे लोकप्रिय दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेला सैराट यशाच्या इतक्या उंचावर पोहोचला कि अनेक पुरस्कार या चित्रपटाच्या नावे झाले. या चित्रपटासाठी रिंकूलाही सन्मानित करण्यात आलं होत. यानंतर रिंकूने झुंड, कागर, हल्ला हो, मेकअप यासारखे कमाल चित्रपट गाजवले. याशिवाय १०० डेज म्हणून वेबसिरीजमध्ये पदार्पण करीत लारा दत्ता सोबत स्क्रीन शेअर केली होती.