Take a fresh look at your lifestyle.

हाय गरमी..! सई लोकुरच्या बिकिनी फोटोंमूळे सोशल मीडियावर लागली आग; पहा फोटो

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वातील स्पर्धक आणि अभिनेत्री सई लोकुर हि सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते . यामुळे ती नेहमीच विविध पेहरावातील फोटो आणि विविध अंदाजातील व्हिडीओ शेअर करताना दिसत असते. सध्या टीव्ही वा मालिकेत ती भले दिसत नसली तरीही सोशल मीडियावर मात्र ती वारंवार दिसते आणि वारंवार चर्चेतही असते.

सई लोकूर हि सोशल मीडियावरील प्रसिद्ध चेहऱ्यांपैकी एक मानली जाते. अलीकडेच तिने तिचे बिकिनी फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो पाहून चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढली नसेल तर बाबा आश्चर्यच… तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

सई सध्या तिच्या हॉट आणि बोल्ड फोटोंमुळे चांगलीच चर्चेत आहे. माहितीनुसार, सई सध्या गोव्यात तिची सुट्टी एन्जॉय करताना दिसतेय. यामुळे गोव्यातील काही फोटो आणि व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सईच्या या बिकीनीतील फोटोंनी चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढवत सोशल मीडियावर आग लावली आहे. त्यामुळे तिच्या बोल्ड आणि हटके अंदाजावर हाय गरमी असा काहीसा फील येतोय. या फोटोंमध्ये सई कधी हॉट निळ्या बिकिनीत दिसतेय तर कधी गुलाबी स्विम वेअरमध्ये दिसतेय. तिचे या दोन्ही स्विम वेअर्समधील फोटोज अतिशय लक्षवेधी आहेत.

सईच्या या बिकीनी फोटोंवर नेटकरी आणि चाहत्यांकडून लाइक्सचा तितकाच कमेंट्सचाही वर्षाव होत आहे. सईच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं तर, २ वर्षांपूर्वी तीने सिनेनिर्माता तिर्थदीप रॉयसोबत लग्न केलं. दरम्यान बिग बॉसच्या घरात तिने आपल्या लव्ह लाइफबद्दल खुलासे केले होते. ‘मिशन चॅम्पियन’ या हिंदी चित्रपटातून तिने आपल्या करिअरची सुरुवात केली होती.

मात्र सई लोकुर म्हणून तिला मराठी बिग बॉसनेच प्रकाश झोतात आणलं. याशिवाय कपिल शर्मासोबतदेखील तिने किस किसको प्यार करू या चित्रपटात काम केले होते. तसंच काही महिन्यांपूर्वी ‘सनम हॉटलाइन’ या वेब सीरिजमध्येही ती दिसली होती.