Take a fresh look at your lifestyle.

बोल्ड आणि ग्लॅमरस सईचं नवं क्युट फोटोशूट पाहिलं का?; पहा फोटो

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| मराठी सिनेसृष्टीतील बोल्ड, बिंधास्त आणि ग्लॅमरस अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच तिच्या लुकमुळे चर्चेत असते. सई सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असल्याचे दिसते. त्यामुळे नेहमीच ती आपल्या चाहत्यांसोबत तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे प्रत्येक फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तिचे लूक, तिची स्माईल आणि भन्नाट व्यक्तिमत्व सर्वांना नेहमीच आकर्षित करीत असते. नुकतच तिने एक क्युट फोटोशूट केलं आहे आणि ते सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

या फोटोमध्ये सई पांढरा निळा रंगाचा फ्रॉक परिधान केलेली दिसत आहे. या फ्रॉकमध्ये ती फारच सुंदर आणि गोड दिसत आहे. तिच्या या फोटोंनी भल्याभल्यांच्या दांड्या उडवल्या आहेत. सईने केसांचा पोनी बांधला आहे आणि फ्रॉकवर फ्लपी श्रग परिधान केले आहे. तर हातापायाच्या नखांना निळ्या रंगाची नेलपेंट लावली आहे. पायात हीलची चप्पल आणि चेहऱ्यावर अतिशय लोभसवाणे हास्य असा सईचा हा लूक एखाद्या डॉलसारखा वाटतो आहे. तिच्या या फोटोंवर तिचे चाहते सहकलाकार मित्र मंडळी मोठ्या उत्साहाने कौतुकास्पद प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

सई ताम्हणकर नाम तो सूना होगा अश्या ऐटीची आणि रुबाबाची ही अभिनेत्री आहे. मराठी इंडस्ट्रीमध्ये आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून सई ताम्हणकर हे नाव घेतले जाते. फक्त मराठीच नव्हे तर सईने बॉलीवुड इंडस्ट्री देखील गाजवली आहे. सईने आतापर्यंत एकापेक्षा एक असे हटके चित्रपट सिनेसृष्टीला दिले आहेत. यामध्ये सनई चौघडे, हापूस, दुनियादारी, नो एन्ट्री, जाऊ द्या ना बाळासाहेब, प्यारवाली लव्हस्टोरी असे जबरदस्त मराठी चित्रपट सईच्या नावावर आहेत. तर हंटर, मिमी, लालबाग परळ, वेक अप इंडिया या सारखे बॉलिवूड चित्रपट तिने केले आहेत. याशिवाय तिने तमिळ सिनेसृष्टीत देखील काम केले आहे.