Take a fresh look at your lifestyle.

थांब ना रे तू बाबा! सायली संजीवच्या वडिलांचे निधन; सोशल मीडियावर केली भावुक पोस्ट

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सायली संजीवच्या वडिलांचे निधन झाले. तिच्या कुटुंबावर जणू दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचे ३० नोव्हेंबर, २०२१ रोजी निधन झाले आहे. सायलीने आपल्या आयुष्यातील सगळ्यात मौल्यवान वेळ हा आपल्या वडिलांसोबत घालवला असून ती त्यांच्या अतिशय जवळ होती. याबद्दल तिने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत वडिलांचे छत्र हरपले असल्याची माहिती दिली आहे. सायलीच्या या पोस्टवर अनेक मराठी कलाकारांनी आणि चाहत्यांनी तिच्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली आहे. शिवाय तिला काळजी घे! सांगणाऱ्या कमेंट्स केल्या केल्या आहेत.

सायलीच्या वडिलांचे नाव संजीव असून सायली आडनाव नव्हे पण बाबांचे नाव मात्र गर्वाने लावते. सायली नेहमीच तिचं वडिलांच्या फार जवळ होती. यामुळे नाइकडं ती सोशल मीडियावर बाबांसोबतचे क्षण पोस्ट करताना दिसायची. सायलीने तिच्या इंस्टाग्रामवर वडिलांसोबतचे फोटो शेअर करत एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. यात तिने लिहिले की, संजीव २६/०७/१९५८ – ३०/११/२०२१. तुला माहित आहे नं बाबा माझं तुझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम होतं, आहे आणि कायम असेल.. या जगात सगळ्यात जास्त.. तू आयुष्य आहेस माझं. तिने पुढे लिहिले की, दैव होता तू, देव होता तू, खेळण्यातला माझा खेळ होता तू.. शहाणी होते मी, वेडा होता तू, माझ्या साठी कारे सारा खर्च केला तू.. आज तू फेडुदे पांग हे मला, जगण्या रे मला अजूनही तूच हवा..बाबा, थांब ना रे तू बाबा, जाऊ नको दूर.. तिची हि पोस्ट अतिशय भावनिक करणारी आहे. सायलीच्या अनेक चाहत्यांनी तिला पोस्टवर कमेंट करीत धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.

अभिनेत्री सायली संजीवचा नुकताच मराठी बिग बजेट चित्रपट ‘झिम्मा’ सर्व राज्यभरात चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात सायलीने कृतिका नामक भन्नाट आणि भारी अशी भूमिका साकारली आहे. तिच्यासोबत या चित्रपटात ६ तोडीच्या मराठी अभिनेत्रीचा समावेश आहे. यात क्षिती जोग, सोनाली कुलकर्णी, निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, मृण्मयी गोडबोले यांचा समावेश आहे. याशिवाय या चित्रपट अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि हेमंत ढोमेसुद्धा मुख्य भूमिकेत आहेत.