Take a fresh look at your lifestyle.

नाय नाय आता तू पवईची मैना! श्रुती मराठेचा व्हिडीओ पाहून हेमांगीची भन्नाट कमेंट

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपटसृष्टीत अनेक सुंदर आणि ग्लॅमरस अश्या अभिनेत्री आहेत. त्यातील एक म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री श्रुती मराठे. श्रुती सध्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते. आजकाल सोशल मीडियाचा वापर बरेच कलाकार आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी करताना दिसतात. तशीच श्रुतीसुद्धा सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांशी संपर्क साधते. बऱ्याचदा सोशल मीडियावरील ग्लॅमरस आणि लक्षवेधक फोटोंमुळे ती चर्चेत येत असते. मात्र यावेळी ती एका व्हिडीओमुळे खूप चर्चेत आहे. या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळते आहेच पण त्यासोबत अनेक कलाकार मंडळी देखील तिच्या व्हिडिओवर कमेंट करताना दिसत आहेत. तिच्या व्हिडिओवर अभिनेत्री हेमांगी कवीने अशी काही भन्नाट कमेंट केली आहे कि ती कमेंट साऱ्यांचे लक्ष वेधू लागली आहे. त्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

अभिनेत्री श्रुती मराठेने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, पुण्याची मैना..! गालावर नाही पण हनुवटीवर पडते खळी. या व्हिडीओत मला म्हणत्यात हो, म्हणत्यात पुण्याची मैना या गाण्यावर ती आपल्या दिलखेचक अदा दाखवताना दिसत आहे.

श्रुतीचा हा व्हिडीओ पाहून तिचे चाहते घायाळ झाले आहेत. या व्हिडीओवर तिच्या अनेक चाहत्यांनी कमेंट करत तिचे कौतुक केले आहे. तर तिच्या या व्हिडीओवर अभिनेत्री हेमांगी कवीने भन्नाट कमेंट करीत लिहिले की, नाय नाय आता तू पवईची मैना! सुंदर तर तू आहेसच गं पण कमाल गोडुली दिसत्येस… नसताना! या कमेंटची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे.

मराठी अभिनेत्री श्रुती मराठे हिने दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये तामिळ भाषिक ‘प्रेम सूत्र’ तर मराठी इंडस्ट्रीमध्ये ‘सनई चौघडे’सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. श्रुतीने विविध मराठी आणि तमिळ चित्रपटात विविध भूमिकांमध्ये काम केले आहे. साउथमध्ये ती ‘श्रुती प्रकाश’ या नावाने अत्यंत प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या अंदाजातील श्रुतीच्या फोटोंना सोशल मीडियावर रसिकांची कायमच पसंती मिळत असते. तिने मराठीसह दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतही चाहत्यांची मने जिंकली आहेत. तमिळ चित्रपट ‘इंदिरा विजहा’ने मधून तिने आपल्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली. श्रुती अभिनेता गौरव घाटणेकरसोबत तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये होती. यानंतर दोघांनी लग्न केले. गौरव घाटणेकरदेखील मराठी टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीतील एक नावाजलेले नाव आहे.