Take a fresh look at your lifestyle.

‘बाबा… तुमच्याशिवाय जगणं खूप अवघड’ अभिनेत्री श्वेता अंबिकरची वडिलांच्या निधनानंतर भावनिक पोस्ट

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ मालिकेला प्रेक्षकांनी अगदी भरभरून चांगला प्रतिसाद दिला आहे. मालिकेतील माऊचे पात्र आणि कथानक प्रेक्षकांना अत्यंत भावले आहे. या मालिकेने नुकताच २०० भागांचा टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. मात्र या दरम्यान मालिकेतील अभिनेत्री श्वेता अंबिकारच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले आहे. आपल्या वडिलांच्या निधनामुळे श्वेता खचली आहे. दरम्यान तिने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. श्वेताने हि भावनिक पोस्ट शेअर करत लिहिले की, बाबा..तुमच्याशिवाय जगणं खूप अवघड आहे.

मुलगी झाली हो या मालिकेमुळे प्रकाश झोतात आलेली अभिनेत्री श्वेता अंबिकर आपल्या वडिलांच्या निधनामुळे अत्यंत दुखी आहे. हे दुःख पचविणे तिच्यासाठी फार सोपे नाही. वडिलांच्या अगदी जवळ असणाऱ्या श्वेताने शोक व्यक्त करीत इंस्टाग्रामवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे कि बाबा………………………..तुमच्याशिवाय जगणं खूप अवघड आहे.. मिस यु सो मच.. आय लव्ह यु बाबा… श्वेताच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी तिला दुःखात साथ देत खंबीर राहण्यास म्हटले आहे. तसेच आम्ही तुझ्या दुखत सहभागी आहोत असे म्हणत त्यांनी तिला आधार दिला आहे.

श्वेता अंबिकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर तिने मुलगी झाली हो या मालिकेत आर्याची भूमिका साकारली आहे. या मालिकेव्यतिरिक माझे मन तुझे झाले, दुर्वा, पुढचं पाऊल, बाजी, तू माझा सांगाती, दिल दोस्ती दुनियादारी या मालिकांमधून तिने काम केले आहे. भेट या मराठी चित्रपटातही तिने काम केले आहे. सध्या मुलगी झाली हो मालिकेचे गोव्यात होत असलेले शूटिंग नुकतेच बंद झाले आहे. त्यामुळे मालिकेचे शूट आता गुजरातमध्ये करण्यात येईल असे बोलले जात आहे. याबाबत अधिकृत बातमी लवकरच समोर येईल. या मालिकेतील माऊ, आर्या, विलास, सिद्धांत, दमयंती ही सर्वच पात्र प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहेत. त्यामुळे अल्पावधीतच या मालिकेला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. आता काही दिवसांसाठी तरी मालिकेचे कलाकार घरीच राहून आपल्या आरोग्याची काळजी घेण्यावर भर देताना दिसणार आहेत.