Take a fresh look at your lifestyle.

मराठमोळी अभिनेत्री सोनाली खरे देतेय बर्फ योगातून संदेश; जाणून घ्या नेमका काय आहे हा संदेश

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री सोनाली खरेने अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केले आहे. आपल्या अभिनय शैलीच्या जोरावर तिने सिनेसृष्टीत आपले हक्काचे स्थान निर्माण केले. सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असणारी सोनाली सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती बर्फावर योग करताना दिसतेय. सध्या हा व्हिडीओ वेगाने वायरल होत आहे.

सोनालीने शेअर केलेला हा व्हिडिओ सगळ्याचच लक्ष वेधून घेतोय . हा बर्फमयीन योग करताना व्हिडीओ पोस्ट करताना तिने एक सुंदर संदेश देणारे कॅप्शन दिले आहे. “..जिथे तुमचा कम्फर्ट झोन संपतो, तिथूनच खऱ्या आयुष्याला सुरुवात होते’ असे हे कॅप्शन आहे. तसेच कॅप्शनमध्ये म्हटल्याप्रमाणे तिने आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडत काही तरी हटके करण्याचा प्रयत्न केला आहे, हे मान्य करावेच लागेल.

सोनालीच्या या हटके पोस्टवर तिचा नवरा बिजय आनंद याने मजेशीर कमेंट केली आहे. शीर्षासन करताना पडतानाचे याआधीचे व्हिडीओ तू पोस्ट केले नाहीस’, अशी कमेंट करत बिजयने सोनालीची मस्करी केली आहे. त्यावर काही चाहत्यांनीही ते व्हिडीओ पाहण्यास इक्साईटेड असल्याचं देखील म्हटले आहे. सोनालीचा नवरा बिजय आनंद याने १९९८ मध्ये ‘प्यार तो होना ही था’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात त्याने काजोलच्या प्रियकराची भूमिका साकारली होती. काही वर्षे चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केल्यानंतर अभिनेता बिजयने अभिनयातून ब्रेक घेतला आणि योगा शिकण्याकडे आपले लक्ष वळविले. त्यानंतर बिजय यांनी स्वत:चे योगा सेंटर देखील सुरू केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.