Take a fresh look at your lifestyle.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने शेअर केला साखरपुड्याचा खास व्हिडीओ

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत सोनाली चाहत्यांच्या संपर्कात कायम असते. तिने इन्स्टाग्रामवर नुकताच एक खास व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ सोनालीच्या साखरपुड्याचा आहे. नुकताच दुबईमध्ये सोनालीचा साखरपुडा कुणाल  बेनोडकर यांच्याशी पार पडला. या साखरपुड्याचे काही क्षण तिने व्हिडीओमार्फत चाहत्यांपर्यंत पोहोचवले आहेत.

सोनालीने मे महिन्यात तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिने साखरपुडा झाल्याचं सांगितले होते.माझा वाढदिवस संपण्यापूर्वी मला एक खास घोषणा करायची आहे. माझ्या फियान्सेची ओळख तुम्हाला करून द्यायची आहे. २ फेब्रुवारी रोजी आमचा साखरपुडा झाला आणि आमचा हा आनंद तुम्हा सगळ्यांसोबत वाटण्यासाठी आजच्या पेक्षा योग्य दिवस असूच शकत नाही असं मला वाटतं. आपले शुभाशीर्वाद कायम पाठीशी असू द्या’, असं सोनालीने फोटोसोबत लिहिलं होतं.

सोनालीने याआधीही तिच्या रिलेशनशिपबद्दल माहिती दिली होती. आता तिच्या लग्नाच्या तारखेची घोषणा कधी होणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे