Take a fresh look at your lifestyle.

होली है। मराठमोळ्या अभिनेत्रींची कलरफुल होळी; सोशल मीडियावर फोटो झाले व्हायरल

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज धुलीवंदनाचा रंगबेरंगी असा सण आहे. त्यामुळे सर्वत्र कसा उत्साह आहे चैतन्य आहे. अशा वातावरणात नुसता मजा आणि मस्तीचा रंग प्रत्येकाला चढलेला असताना जो तो भावभावनांच्या रंगांसह खऱ्या खुऱ्या रंगात रंगलेला दिसतो. त्यामुळे आज सख्खा असो वा चुलत, मित्र असो वा शत्रू सगळेच रंगात रंगून जातात आणि होळीचा सण उत्साहात साजरा करतात. राज्यभर होळी आणि धुलिवंदन साजरे होत असताना कलाविश्वात रंग उधळणार नाहीत असे कसे होईल हा? तर अनेक मराठी कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना कलरफुल शुभेच्छा देत विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत.

अभिनेत्री सई लोकूरनेही होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “सर्वांना होळीच्या शुभेच्छा! मी एक रंगीबेरंगी आत्मा आहे आणि मला अनंतापर्यंत असेच राहायचे आहे”, असं कॅप्शन तिने दिलंय.

अभिनेत्री वैदेही परशुरामीने इन्स्टावर एक फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. “होळीच्या रंगीबेरंगी शुभेच्छा! तुम्हा सर्वांना आनंदी, सुरक्षित आणि रंगीबेरंगी होळीच्या शुभेच्छा!”, असं कॅप्शन तिने दिलं आहे.

अभिनेत्री रूपाली भोसलेने एक व्हीडिओ शेअर करत सगळ्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

तसेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनेदेखील गुलाबी रंगाच्या साडीतील फोटो शेअर करत, होळी व धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा असे कॅप्शन दिले आहे. याशिवाय तिने फुलकारी असे कॅप्शन देत स्वतःचे कमाल फोटो शेअर केले आहेत.

दरम्यान अभिनेता सुयश टिळकनेदेखील एक सुंदर फोटो शेअर करत सगळ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तर रंगीबेरंगी छत्र्यांच्या सावलीतून सुयशची पत्नी आयुषी चालत आहे. हा फोटो त्याने इंस्टाग्रामवर शेअर केलाय.