Take a fresh look at your lifestyle.

शिव करतोय आज्जीसोबत चील बनवतोय इन्स्टा रील; व्हिडिओ झाला वायरल

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनचा विजेता शिव ठाकरेने या सीझनमधून खूप लोकप्रियता मिळवली आहे. त्याचा क्युट अंदाज आणि बोली भाषा यांमुळे तो खूपच प्रसिद्ध झाला. आजकाल शिव सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय दिसतोय. फोटोज आणि व्हिडीओज शेअर करीत तो आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असतो. नुकताच त्याने आपल्या आज्जीसोबत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ लोकांना फारच आवडला आहे. सध्या हा व्हिडीओ ट्रेंडिंग व्हिडीओज पैकी एक आहे.

शिवने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओत तो त्याच्या आज्जीसोबत दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने लिहिले की, बिंदी में तू किंनी सोनी लगदी आजी. तसेच त्याने सर्वांना घरी रहा आणि सुरक्षित रहा असेही सांगितले आहे. या व्हिडीओत शिव आपल्या आजीला बेबी तेरे चेहरेसे नजर नहीं हटती मैं क्या करू… बिंदी मै तू किंनी सोनी लगदी असे म्हणताना दिसतो आहे. या व्हिडिओत मोबाईल आज्जीकडे वळवल्यानंतर आज्जी अक्षरशः लाजताना दिसत आहे. इतकेच नव्हे तर शिवला आज्जीने अगदी लहान मुलाला लाडूकपणे मारतात तसे मारतानाही दिसत आहे.

शिव मराठी बिग बॉस २ चा विजेता आहे. इतकीच नव्हे तर याआधी तो एम टीव्ही रोडीजमध्ये दिसला होता. बिग बॉस शोदरम्यान शिव आणि वीणा जगताप यांच्यामध्ये मैत्रीचे झाली होती. बघता बघता या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. बिग बॉस जिंकता यावे म्हणून शिव ठाकरे आणि वीणा जगतापने ड्रामा केला अशीही टीका त्यांच्यावर झाली होती. मात्र याकडे दुर्लक्ष करत त्यांनी प्रेमाची जाहीर कबुली दिली. एकमेकांसोबत फोटो व व्हिडीओ शेअर करण्याचा त्यांनी एकसुरी लावला होता. दरम्यान शिव आणि वीणाचे ब्रेकअप झाल्याच्या चर्चांणा उधाण आले होते. मात्र शिव आणि वीणाने होळी एकत्र साजरी करून या चर्चांना फुलस्टॉप लावला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.