Take a fresh look at your lifestyle.

दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना अंडरवर्ल्डमधून धमकी ; एकाला अटक

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन  | मराठी चित्रपटसृष्टीमधील उत्कृष्ठ अभिनेते  आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी अंडरवर्ल्डमधून धमकी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. महेश मांजरेकर याना तब्बल 35 कोटींची खंडणी मागण्यात आली आहे.अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमच्या नावाने महेश मांजरेकर यांना खंडणीची धमकी मिळाली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

मुंबई पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अटक केलेला आरोपी 34 वर्षांचा असून त्यानं महेश मांजरेकर यांना खंडणीसाठी धमकी दिली. यासाठी आरोपीनं अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमच्या नावाचा वापर केला. मात्र, आरोपी आणि अबू सालेम याचा काहीही संबंध नसल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे. पोलीस आरोपीची कसून चौकशी करत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’