Take a fresh look at your lifestyle.

‘इफ्फी’ 2021 महोत्सवात मराठी चित्रपट ‘फनरल’ची वर्णी

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गोव्यात होऊ घातलेल्या ५२ वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) २०२१ साठी अनेक चित्रपटांची अधिकृत निवड जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान मराठी भाषिक तब्बल ६ चित्रपटांचा समावेश यात आहे. यामध्ये ‘फनरल’ या मराठी चित्रपटानेदेखील स्थान पटकावले आहे. अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महोत्सवामध्ये ‘फनरल’ या मराठी चित्रपटाला गौरवण्यात आले आहे. याआधी पुणे आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव, अंबरनाथ महोत्सव, राजस्थान चित्रपट महोत्सव या महोत्सवांमध्ये ‘फनरल’ची निवड झाली होती. यातल्या अंबरनाथ आणि राजस्थान चित्रपट महोत्सवात या चित्रपटाने पुरस्कार पटकावले.

‘फनरल’ या चित्रपटात सामाजिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असा विषय मांडण्यात आला आहे. सद्यपरीस्थितीला धरून असलेला हा विषय प्रत्येकाला अंत:र्मुख करणारा आहे असे काहीसे मत निर्माते व लेखक रमेश दिघे यांनी मांडले आहे. या चित्रपटाविषयी बोलताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान या संवादासदरम्यान दिघे म्हणाले, हा चित्रपट प्रत्येक सर्वसामान्यांना भिडणारा असून आपल्यातला पण महत्वाचा असा विषय आहे. त्यामुळे प्रेक्षकांना नाकी आवडेल.

आपल्या रोजच्या जगण्यातील भाव-भावनांचे प्रतिबिंब चित्रपटात उमटले पाहिजे, हाच विचार करुन सर्वसामान्यांच्या जीवनाला भिडणारा विषय ‘फनरल’ चित्रपटात मांडल्याचे दिग्दर्शक विवेक दुबे सांगतात’. या चित्रपटात अभिनेता आरोह वेलणकर, विजय केंकरे, प्रेमा साखरदांडे, संभाजी भगत आदि मान्यवर कलाकारांच्या या मुख्य आणि महत्वपूर्ण भूमिका आहेत. निर्माते व लेखक रमेश दिघे व दिग्दर्शक विवेक दुबे या जोडीने सिनेसृष्टीची कोणतीही पार्श्वभूमी नसताना त्यांनी एक छान सामाजिक कथा ‘फनरल’ चित्रपटाच्या स्वरूपात मांडली आहे. त्यांच्या कल्पनेचे विशेषत्व ‘फनरल’ चित्रपटाला मिळालेला सन्मान आणि राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय स्तरावर होणारे कौतुक स्पष्ट करत आहे.