Take a fresh look at your lifestyle.

‘रहस्य’ चित्रपटाचे पोस्टर रिलीज; ‘या’ कलाकारांच्या आहेत प्रमुख भूमिका…

0

चंदेरी दुनिया । प्रत्येक नवी रात्र ही रहस्याला जन्म देत असते. अशाच एका रहस्याचा आणि त्या रहस्याचा शोध घेण्याच्या प्रवासाचा थरारक अनुभव देणारा ‘भावेश प्रोडक्शन्सचा’ ‘रहस्य’ हा आगामी मराठी चित्रपट ७ फेब्रुवारी २०२० ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तत्पूर्वी कलाकार व तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत चित्रपटाचा शानदार पोस्टर अनावरण सोहळा नुकताच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या हस्ते संपन्न झाला.

नव्या पिढीचे नवीन आशय असलेले चित्रपट मोठ्या प्रमाणात येत असून मराठी चित्रपटासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे असं सांगत मेघराज राजेभोसले यांनी ‘रहस्य’ चित्रपटाला व चित्रपटाच्या संपूर्ण टीमला यावेळी शुभेच्छा दिल्या. भव्यदिव्य स्वरूपात चित्रपट सादर करून पडद्यावर लोकांना वेगळा अनुभव देण्याचा प्रयत्न ‘रहस्य’ चित्रपटातून केला असून आमचा हा प्रयत्न प्रेक्षकांना आवडेल असा विश्वास दिग्दर्शक भावेश पाटील यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

मराठी चित्रपटात अलीकडे प्रेक्षकांना नवे काहीतरी देण्याचा प्रयत्न सातत्याने होत असतो. या प्रयत्नातूनच अनेक नवे प्रयोग मराठी चित्रपटात घडताना दिसतात. भावेश पाटील दिग्दर्शित ‘रहस्य’ या चित्रपटातही व्हीएफक्स तंत्रज्ञानाचा मराठीत आजपर्यत कधीही न दिसलेला सर्वाधिक वापर दिसणार आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे नव्या दमाच्या कलाकारांनी हा चित्रपट साकारला आहे.

घडणाऱ्या रहस्यमय घटनांचा तपास आणि त्या तपासाअंती बाहेर येणारं दडलेलं ‘रहस्य’ हा या चित्रपटाचा गाभा आहे. लकी बडगुजर, राकेश बागुल, स्वाती पाटील, ऋतुजा सोनार, स्वाती शुक्ला आदी कलाकारांच्या यात भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा-पटकथा भावेश पाटील यांची आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: