Take a fresh look at your lifestyle.

‘डोंबिवलीत आले झोंबी.. एकतर पळायचं, नाहीतर लढायचं’; थरारक ‘झोंबिवलीचा’ झोंबीमय ट्रेलर रिलीज

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आदित्य सरपोतदार दिग्दर्शित पहिला वहीला मराठमोळा झोंबी चित्रपट लवकरच आता प्रेक्षकांना थोडं घाबरवायला आणि फुल एंटरटेन करायला येत आहे. या चित्रपटाचं नाव आहे ‘झोंबिवली’. हा प्रयोगशील चित्रपट असून या चित्रपटातील गाण्यांना आधीच प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलं आहे. यानंतर आता चित्रपटाचा थरारक झोंबीमय ट्रेलर रिलीज झाला आहे. हा ट्रेलर जितका भारी तितकीच उत्सुकता वाढू लागली आहे. या ट्रेलरमध्ये थरार आहे, मनोरंजन आहे, भन्नाट कलाकार आहेत, कथा आहे, मजा आहे, रोमान्स आहे, थोडा चान्स आहे आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे डोंबिवलीत झोंबी आहेत. मग आणखी काय पाहिजे?

 

झोंबिवली हा चित्रपट अत्यंत बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित चित्रपट आहे. प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच चित्रपटाच्या गाण्यांनी एक वेगळा उत्साह निर्माण केला होता. अंगात आलंय या गाण्यातून अभिनेता सिद्धार्थ जाधवमधील कलाकार झोंब्याने तर अख्खा महाराष्ट्र झोंबीवाला डान्स करत थिरकवला. यानंतर आता रिलीज झालेल्या ट्रेलरने तर लोकांच्या उत्सुकतेचा पारा हाइ केला आहे. या ट्रेलरमध्ये आपण पाहू शकता कि, सामान्यांच्या जगात जेव्हा असामान्य गोष्ट घडते आणि तेव्हा जो थरार निर्माण होतो. शिवाय झोंबी हा प्रकार काल्पनिक वाटत असताना अचानक जेव्हा वाकड्या तिकड्या हालचाली करणाऱ्या झोंबीच्या तुकड्या समोर येतात तेव्हा सुचायचे बंद होत. एकवेळेला बुद्धी बंद पडते पण इथे ज्याला जगायचं आहे त्याने लढायचं आहे. त्यामुळे हा पूर्ण चित्रपट तुम्हाला एकही मिनिट कंटाळा येऊ देणार नाही इतकं नक्की.

आदित्य सरपोतदार यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘झोंबिवली’ चित्रपटाच्या ट्रेलरमूळे एकंदरच प्रेक्षकांची आतुरता आणखीच वाढली आहे. या चित्रपटात अभिनेता ललित प्रभाकर, वैदेही परशुराम आणि अमेय वाघ हे भन्नाट कलाकार दिसत आहेत. झोंबिवली चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख या तिघांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट शेअर करत सांगितली आहे. या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत तिघांनी लिहिले आहे ‘आम्ही पाच, पडणार झोंब्यांवर भारी ! २६ जानेवारीला येतोय करून सगळी तयारी ! अर्थातच ‘झोबिंवली’ हा चित्रपट येत्या प्रजासत्ताक दिनादिवशी म्हणजेच २६ जानेवारी २०२२ रोजी चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे. काय मग तयार आहेत ना झोंबीमय एंटरटेनमेंट साठी..? तयार व्हावंच लागतंय.