Take a fresh look at your lifestyle.

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेतील ओमच्या खऱ्या फॅमिलीचा फोटो होतोय वायरल; तुम्ही पाहिलात का?

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण राज्यात कोरोना विषाणूचा वाढत संसर्ग पाहता प्रशासनाकडून कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. १५ एप्रिल ते ३० एप्रिल या दरम्यान शासनाच्या निर्बंधांचे कडक पालन करणे बंधनकारक आहे. परिणामी मालिकांचे आणि आगामी चित्रपटांचे शूटिंग तात्काळ थांबविण्यात आले आहे. अश्यावेळी अनेक कलाकारांनी आपल्या घरची वाट धरली आहे. झी मराठीवरील मालिका येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेतील ओम थेट पुण्यात आपल्या घरी गेला आहे. मुळात शाल्व किंजवडेकर पुण्याचा आहे. त्यामुळे घरापासून दूर मुंबईत मालिकेचे शूटिंग करीत असल्यामुळे त्याचे घरी येणे फारसे अवघडच होते. पण शासनाकडून लावण्यात आलेल्या निर्बंधामुळे शूटिंग सध्या थांबली आहे. त्यामुळे शाल्व आई बाबांजवळ पुण्याला गेला आहे. दरम्यान शाल्वच्या बाबांनी इंस्टाग्रामवर फॅमिली फोटो शेअर केला आहे. हा फोटो प्रचंड वायरल होतोय.

अभिनेता शाल्व किंजवडेकर याचे बाबा चारु किंजवडेकर यांनी इंस्टाग्रामवर ओम घरी आल्याचा फोटो शेअर केला आहे. खूप दिवसांनी ओम घरी आला आहे असं कॅप्शन त्यांनी या फोटोसाठी दिले आहे. शाल्वचा हा फॅमिली फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. शाल्वचा सोशल मीडियावर स्वतःचा असा मोठा चाहतावर्ग आहे. त्याच्या प्रत्येक पोस्टवर त्याचे चाहते मोठ्या संख्येने लाईक्स करत असतात. येऊ कशी तशी मी नांदायला हि मालिका शाल्व साठी ओम हे पात्र घेऊन आली. या पात्रामुळेच ओमचा चाहता वर्ग मोठ्या संख्येने वाढला आहे.

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ हि मालिका झी मराठी या वाहिनीवर प्रसारित होते. अगदी काही दिवसांपूर्वीच हि मालिका सुरु झाली आहे. मात्र तरीही एक एक दिवस सरता हि मालिका लोकप्रिय होऊ लागली आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. ‘अन्विता फलटणकर’ आणि ‘शाल्व किंजवडेकर’ ह्या नव्या जोडीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. सोबतच मालिकेतील शकू, नलू, मालविका, रॉकी, मोहित आणि त्यांचा पाळीव मित्र जादू या साऱ्या पात्रांनी रसिकांची पसंती मिळवली आहे.