Take a fresh look at your lifestyle.

चार दिवस सासूचे’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ‘..डोळ्यांमधले खारट पाणी.. गालांवरती ओघळणार्‍या मंद मंद हासूचे चार दिवस सासूचे’, हे शब्द कानावर पडले की आजही आठवते ती म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाच्या मनावर अधिराज्य गाजलेली मालिका ‘चार दिवस सासूचे’.या मालिकेने त्याकाळी प्रेक्षकांच मन जिंकलं होत.’आशालता देशमुख’हे पात्र त्याकाळी घराघरात पोचलं होत. लवकरच ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आईची सासू होतानाची घालमेल, तिचे विचार, तिची भीती हे कोणीच समजू शकणार नाही. मुलाचे लग्न हे आईच्या जीवनातील परमोच्च सुख. प्रत्येक आईचे तिच्या मुलांच्या लग्नाविषयी, तिच्या होणार्‍या सुनेविषयी स्वप्न असतात. ‘चार दिवस सासूचे’ ही मालिका देखील याच कथासुत्रावर आधारलेली आहे. आशालता देशमुख यांची देखील त्यांच्या मुलाच्या लग्नाविषयी अशीच स्वप्न आहेत. पण जेव्हा त्यांचा मुलगा घरात अनुराधाला सून म्हणून घेऊन येतो तेव्हा काय होतं? आशालता देशमुख यांचे मन ती कसं जिंकणार? अनुराधा घर कसं सांभाळेल हे एकंदरीत या मालिकेत पाहायला मिळतं. आशालता देशमुख यांची भूमिका ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी आणि अनुराधाची भूमिका कविता लाड – हिने साकारली आहे. ही मालिका ३ ऑगस्टपासून रात्री ९.३० वाजता कलर्स मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Comments are closed.