Take a fresh look at your lifestyle.

‘बिग बॉस’ मराठी लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | छोट्या पडद्यावरील आवडीने पाहिला जाणारा शो म्हणजे ‘बिग बॉस’. ‘बिग बॉस मराठी’चं तिसरं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.नुकतंच कलर्स मराठीने ‘बिग बॉस’ चा टीझर प्रदर्शित केला आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून बिग बॉसच्या घरात टास्क कसे रंगणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. बिग बॉसच्या घराच्या थीमविषयीसुद्धा उत्सुकता आहे.

बिग बॉस मराठीचं पहिलं पर्व १५ एप्रिल २०१८ रोजी पार पडलं.पहिल्या पर्वाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.या पर्वामध्ये अभिनेत्री मेघा धाडे विजय ठरली. त्यानंतर दुसरं पर्वही प्रेक्षकांना आवडलं. या पर्वामध्ये शिव ठाकरेने ‘बिग बॉस मराठी 2’ ची ट्रॉफी जिंकली. हे दोन्ही पर्व प्रचंड गाजले. त्यामुळे आता प्रेक्षक तिसऱ्या पर्वाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

तिसऱ्या पर्वाचे सूत्रसंचालकसुद्धा महेश मांजरेकरच करण्याची दाट शक्यता आहे. परंतु याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’