Take a fresh look at your lifestyle.

‘पुष्पा’च्या ‘श्रीवल्ली’ गाण्याचं मराठी व्हर्जन जोमात; पहा व्हायरल व्हिडीओ

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या चित्रपटांमध्ये सगळ्यात भारी कामगिरी करीत असलेला दाक्षिणात्य चित्रपट ‘पुष्पा- द राईज’ची जादूच वेगळी आहे. या चित्रपटाने दाखवून दिल कि भावांनो, कंटेन्ट इज बॅक. सध्या ज्याच्या त्याच्या तोंडात याच चित्रपटाचे नाव आणि यातील गाणी आहेत. ‘पुष्पा’मधील ‘श्रीवल्ली’ हे गाणे तर इतके तुफान लोकप्रिय झाले आहे कि काही विचारूच नका. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाची जोडी जितकी हिट गेलीये तितकंच हे गाणं पण हिट गेलं आहे. या गाण्याची लोकप्रियता पाहता आता या गाण्याचं मराठी व्हर्जन तयार करण्यात आलं आहे. विजय खांदारे नावाच्या मराठी तरुणाने या गाण्याचे मराठी व्हर्जन बनविले आहे. सध्या या मराठी व्हर्जन गाण्याचे कौतुक होताना दिसत आहे. इतकेच नव्हे तर आतापर्यंत हे गाणं व्हायरल गाण्यांपैकी एक झाले आहे.

‘पुष्पा’ सिनेमातील ‘श्रीवल्ली’ या गाण्यावर विजय खांदारे या युवकाने तब्बल साडे तीन मिनिटाचे एक मराठमोळे गाणे रचले आहे. यात गावातील दोन युवकांना घेऊन त्यांची प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. हे ‘श्रीवल्ली’ या गाण्याचे मराठी रिमेक व्हर्जन आहे. या गाण्याला आतापर्यंत यूट्यूबवर १२ लाखांहून अधिक व्ह्यूज आणि ६० हजाराहून अधिक लाईक्स आले आहेत. जसे ‘श्रीवल्ली’ हे गाणे लोकांना फार आवडले तसेच हे मराठी वर्जन लोकांना फार आवडते आहे. मुख्य म्हणजे या गाण्याचे शूट पूर्णपणे मोबाईलवर करण्यात आले असल्यामुळे सर्व स्तरांवरून कलाकारांचे कौतुक केले जात आहे.

‘पुष्पा’ बॉक्स ऑफिसवर चांगलाच चर्चेत आहे. तर या सिनेमातील सर्व गाणी चाहत्यांच्या पसंतीस पडली आहेत. यातील ‘श्रीवल्ली’ गाण्याचे तर अनेक चाहते आहेत. आधीच अल्लू अर्जुन आणि रश्मिका यांच्या चाहत्यांचा अगदी सागर आहे. त्यात आता हे दोघे एकत्र म्हणजे कहरच यात काही शंका नव्हतीच आणि ते सिद्धदेखील झाले आहे. याच सिनेमात समंथा प्रभूचे देखील एक आइटम सॉन्ग आहे. या या गाण्यानेही अनेकांच्या दांड्या उडवलया आहेत. या सिनेमातील गाण्यांची खूप मोठी क्रेज केली आहे. यातील प्रत्येक गाण्यावर प्रचंड रिल्स व्हायरल होताना दिसत आहेत. चाहते तर सोडाच अगदी सेलिब्रिटीजला देखील हि गाणी इंस्टाग्राम रिल्स बनवण्याचा मोह आवृ देईना. एकंदरच खूप अल्पावधीत ‘पुष्पा’ प्रेक्षकांसाठी आपलासा झाला.