Take a fresh look at your lifestyle.

.. कदाचित तुमच्या शेजारच्या रिक्षामध्ये मी आहे; मराठमोळ्या अभिनेत्रीची भन्नाट पोस्ट चर्चेत

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मित्रांनो.. जर तुम्ही रिक्षात बसून कुठेतरी प्रवास करत असाल.. तर तुम्ही किमान एकदातरी शेजारच्या रिक्षामध्ये डोकावून पहाच. याच कारण म्हणजे, तुमची लाडकी अभिनेत्री तुमच्या शेजारच्या रिक्षात असू शकते. असं आम्ही नाही तर ती स्वतःच म्हणतेय. हि ती म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसून मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री मुक्ता बर्वे आहे. तिने सोशल मीडियावर चेहऱ्याला स्कार्फ बांधलेला एक फोटो शेअर केला आहे. सोबतच तिने एक भन्नाट कॅप्शन लिहीत नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तर रिक्षात असणाऱ्या चाहत्यांची मात्र तिने धडधड वाढवली आहे.

मराठी अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने तिच्या अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिने स्वतःचा चेहरा पूर्णपणे स्कार्फने झाकलेला दिसतोय. इतकंच काय तर तिने डोळ्यावर देखील गॉगल लावल्यामुळे तिला ओळखणं अतिशय कठीण झालं आहे. पण तिच्या या फोटो आणि पोस्टने मात्र चाहत्यांच लक्ष चांगलंच वेधून घेतलाय. शिवाय तिने या फोटोंसोबत असं काही कॅप्शन लिहिलं आहे कि ते पाहून चाहते आणखीच उत्सुक झाले आहेत. या फोटोसोबत कॅप्शनमध्ये मुक्ताने लिहिले कि, हॅशटॅग कॅच मी इफ यू कॅन… कदाचित तुमच्या शेजारच्या रिक्षामध्ये मी आहे. मुक्ता मुंबईत रिक्षामधून प्रवास करतेय हे या फोटोंवरून स्पष्ट होत आहे. यानंतर तिच्या फोटोंवर चाहत्यांकडून मात्र कमेंटचा पाऊस पडतोय.

या फोटोंवर एका नेटकऱ्याने लिहिलं आहे की, हाडाची पुणेकर. तर आणखी एकाने लिहिलं कि, पुणेरी गुंड. याशिवाय आणखी एकाने कमेंट करीत लिहिलं कि, बहुतेक आम्ही बघितला आणि Insta मुळे ओळखलं. तर आणखी एकाने लिहिलं कि, मास्कचा खराखुरा आणि योग्य उपयोग. अशा भरपूर कमेंटने तिची पोस्ट चांगलीच दणाणून गेली आहे. अनेकांना तर हा प्रश्न देखील पडला आहे कि, मुक्ताचा हा लूक तिच्या आगामी प्रोजक्टचा तर भाग नाही ना..? आता असं मुक्ताने सांगितलं तर नाही पण लोकांचा आपला एक वेगळा अंदाज.